Tuesday, 14 February 2023

कृषी क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी कृषिमंत्री व आयुक्त कृषी जर्मनी दौऱ्यावर !

कृषी क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी कृषिमंत्री व  आयुक्त कृषी जर्मनी दौऱ्यावर !

जर्मनी येथे भरणार सर्वात मोठा सेंद्रिय व्यापार मेळावा.

मुंबई, अखलाख देशमुख‌, दि १४ : सेंद्रीय पद्धतीने शेती करणे हे जमिनीस पोषक ठरते. तसेच आरोग्यासाठी उत्तम असल्याने ह्याची मागणी दिवसोंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय परिषद व सर्वात मोठा ऑरगॅनिक व्यापार मेळावां जर्मनी येथे होणार असून  राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार व राज्य आयुक्त कृषी सुनील चव्हाण हे दिनांक १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान जर्मनी दौऱ्यावर आसणार आहे.

या काळात "इंटरनेशनल फेडरेशन ऑफ ऑर्गेनिक एग्रीकल्चर मूवमेंट"ला उपस्थीत राहून ते Nuremberg organic & trade fair ह्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवनार आहे.

यानंतर ठीकठिकाणच्या सेंद्रीय शेती प्रकल्प व त्यावर आधारित उद्योगाला भेट देऊन कृषी मंत्री अब्दुल सत्तार व सुनील चव्हाण, राज्य आयुक्त कृषी, ही पद्धत आपल्याकडे कशी अवलंबली जाईल या दृष्टीने अभ्यास करणार आहेत. 

परदेशी गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात कशी आणता येईल व सेंद्रिय शेतीची भरभराट कशी होईल यावर त्यांचा विशेष भर असणार आहे.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...