Tuesday, 14 February 2023

धामापूर मोऱ्याचीवाडी येथे श्री रवळनाथ यात्रा व शिवजयंतीचे भव्य आयोजन! !

धामापूर मोऱ्याचीवाडी येथे श्री रवळनाथ यात्रा व शिवजयंतीचे भव्य आयोजन! !

मुंबई / दिपक कारकर 

प्रतिवर्षी प्रमाणे चंदगड तालुक्यातील धामापूर मो-याचीवाडी श्री देव रवळनाथ यात्रा व शिवजयंती उत्सव रविवार दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठ्या दिमाखदार वातावरणात पार पडणार आहे.यात्रेचे विशेष म्हणजे गेली कित्येक वर्षे ह्या सोहळ्याला सादर होणारी ऐतिहासिक नाटकाची परंपरा गावातील हौशी कलाकार पुढे नेहण्याचे काम करत आहेत.देव रवळनाथाने ह्या मातीत खूप वेगळे कलाकार घडवले आहेत.दशावतार नाटक,सोंगी भजन,भजनी मंडळ  अशा सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारी ही मंडळी यात्रेला मात्र,आपल्या स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या शिवरायांना आणि त्यांच्या मावळ्यांना मानवंदना म्हणून दरवर्षी आपल्या कौटूंबिक उदरनिर्वहासाठी कुठेही शहरात असेल तरी जन्मभूमित हजर राहतात. ऐतिहासिक नाटक सादर करताना यावर्षी "पावनखिंड" हे नाटक सादर करण्याचा मानस सर्वच कलाकारांचा आहे.दिग्दर्शक संतोष गुडूळकर आणि अरुण गावडे दिग्दर्शित ही नाट्यकृती आहे. त्यांचे सहकारी संघटक दशरथ गुडूळकर व कलाकार सागर गावडे, विठ्ठल सुतार, संदीप रवळू मोरे, उत्तम झेंडे, मधुकर भगत, जयवंत गुडूळकर, सागर गुडूळकर, संदीप तातोबा मोरे, लक्ष्मण सुपल, अंकुश अमृस्कर, यशवंत अमृस्कर, संदीप तातोबा मोरे, प्रकाश मोरे, हरी कविठकर, सोमनाथ गावडे, शामराव गावडे, गोपाळ गावडे, यशवंत अमृस्कर, गोपाळ मोरे, सागर सीताराम गावडे, आनंद बोलके ह्या हूरहुन्नरी कलाकारांच्या सहभागाने आणि विशेष म्हणजे ह्याच रंगमंचावरून पुढे घडलेले स्वराज्य जननी जिजामाता, बाळू मामा सारख्या मालिका मधील कलाकार युवराज पाटील पुन्हा सर्वांच्या भेटीला "बाजी प्रभू" ह्या मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. गावातील कलाकारांना प्रोत्साहन अणि मार्गदर्शक देणारे कृष्णा कोरगावकर, भिमाना मोरे, दशरथ गावडे, नारायण पाटील व समस्त देवस्थान कमिटी करत आहे. सीताराम मोरे, गुंडू झेंडे संजय मोरे, शिवाजी मोरे, निवृत्ती कोरगावकर, आत्माराम गुडुळकर आदी सर्वांचे ह्या सोहळ्याला मोठं योगदान आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या ह्या सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचे आवाहन रवळनाथ नाट्यमंडळ धामापूर - मोऱ्याचीवाडी व ग्रामस्थ मंडळ/देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...