Wednesday, 15 February 2023

ताम्हणमळा गावाची सायली तांबडे बनली तालुक्यातील पहिली हवाई सुंदरी, आई वडिलांसोबत घेणार पहिले उडान !

ताम्हणमळा गावाची सायली तांबडे बनली तालुक्यातील पहिली हवाई सुंदरी, आई वडिलांसोबत घेणार पहिले उडान !

मुंबई ( निलेश कोकमकर /शांताराम गुडेकर )

             चिपळूण तालुक्यातील दुर्गम अशा भागात वसलेल्या ताम्हणमळा गावातील सायली तांबडे हिने हवाई सुंदरी होण्याचे लहानपणी पाहिलेले स्वप्न प्रयत्नांच्या जोरावर  २०२३ ला पूर्ण केले.ती चिपळूण तालुक्यातील पहिली हवाई सुंदरी म्हणून   ठरली आहे. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी ती मुंबई ते आसाम असा स्वप्नातील प्रवासाला पंख लावून पहिला उडाण घेणार आहे. त्यावेळी तिच्या सोबत आई वडील असावेत अशी ईच्छा देखील व्यक्त केली आणि ती सुद्धा पूर्ण करणार असे तिचं ठाम मत आहे. 
    
              सायलीचा परिवार देशसेवेतच आहे.आजोबा आत्माराम तांबडे सेवानिवृत्त सैनिक आहेत. वडील रवींद्र तांबडे सैन्यदलात सुभेदार पदावर कार्यरत आहेत.आणि काका  प्रवीण तांबडे देखील सैन्य दलात आहेत. पुणे येथील सैनिक शाळेत सायलीचे माध्यमिक शिक्षण झाले. १२ वीत  शिकत असताना मुलांचे क्लासेस घेत असे आणि मनोमनी लवकरच आपण हवाई सुंदरी व्हावं हे हि सतत मनात असे.   नंतर  २०२१ मध्ये पुणे विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर लवकरच तिला हवाई सुंदरी व्हायचे होते परंतु त्या दरम्यान कोरोनामुळे सर्व काही बंद असल्यामुळे तिने  फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये चांगल्या पदावर नोकरीला लागली. तिथे नोकरी करता करता हवाई सुंदरी होण्याची  देखील चालू ठेवली आणि अखेर दीड वर्षानंतर नोकरी सोडून तिच्या स्वप्नातील प्रवास करण्याचा निर्णय घेतला. ह्या साठी तिला तिच्या नातेवाईकांकडून आणि मित्रांकडून देखील चांगली नोकरी सोडू नये म्हणून  विरोध झाला. पण आपली जिद्द आणि स्वप्न पूर्ण करण्यापासून मागे हटने मग जिद्द ती काय ? त्याच बरोबर आई  सुषमा आणि वडील रवींद्र तांबडे यांनी सायलीचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनापासून मुभा दिली. सायली बरोबर आई वडिलांचे देखील स्वप्न पूर्ण होणार होते. सायलीने १५ नोव्हेंबर २०२२ रोजी नोकरी सोडून १७ नोव्हेंबर २०२२ रोजी इंडिगो विमान कंपनीत प्रशिक्षणासाठी रुजू झाली. मुलाखत , समूहचर्चा , परीक्षा आणि वैद्यकीय चाचण्या असा साऱ्या फेऱ्या पार करत तिने तिच्या ध्येयाला गवसणी घातली .  १० फेब्रुवारी २०२३ रोजी ते प्रशिक्षण पूर्ण करून घरी परतली आणि १७ फेब्रुवारी २०२३ ला मुंबई ते आसाम असे  हवाई सुंदरीचे पहिले उडाण घेणार आहे.

1 comment:

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...