महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा ! कोनगावच्या क्षितिज ठोंबरे याने पटकावले कांस्यपदक !!
भिवंडी, प्रतिनिधी - खेलो इंडिया युथ गेम्स कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा कोनगाव येथील क्षितिज बाजीराव ठोंबरे याने कांस्यपदक जिंकत महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
मध्यप्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या वतीने कांस्यपदक जिंकले आहे. क्षितिज ठोंबरे आणि त्याच्या टीमने अतिशय महत्वपूर्ण कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे. कोनगाव भिवंडी येथील चेरोबा क्रीडा मंडळातर्फे गेली आठ वर्षे तो कबड्डी खेळतोय.
मुळचा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कोनगाव येथील रहिवासी असलेल्या क्षितिजला लहानपणापासून कबड्डीची प्रचंड आवड आहे. क्षितिज हा कर्नाटकच्या धारवाड येथील आरएलएस महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे. शाळा-महाविद्यालयात असताना अनेक क्रिडा स्पर्धेत त्याचा सहभाग राहिलेला आहे. खेळाची प्रचंड आवड असल्याने अनेक स्पर्धेत विजय संपादन करणे हाच त्याचा ध्यास राहिलेला आहे. क्षितिज याचे ज्युनिअर इंडियाच्या संघात सहभागी होऊन महाराष्ट्राचं नावलौकिक मिळविण्याचा त्याचा मानस आहे. कोनगावच्या नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात क्षितिजची विजयी मिरवणूक काढण्यात आली. क्षितिज याच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत होता.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने क्षितिज ठोंबरे याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कल्याण जिल्हाध्यक्षा स्वाती कदम, उपशहर अध्यक्षा गीता काट्रप, अनेक पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment