राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर !
मुंबई, प्रतिनिधी : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महाराष्ट्र राज्यपाल पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.
अखेर राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाला आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी रमेश बैस यांची नियुक्ती झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून राज्यपालांच्या अभिभाषण विरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होते. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. महाविकास आघाडी महापुरुषांच्या अपमानाविरोधात राज्यपालांनी राजीनामा द्यावा म्हणून राज्यभरात आंदोलन केली होती.
राज्पाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्ष व सत्ताधारी यांच्याकडून विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. विरोधी पक्षांनी हा निर्णय योग्य असून आधीच घेणे आवश्यक होते असे म्हटले आहे व नविन राज्यपालांचे स्वागत केले आहे.
No comments:
Post a Comment