सिल्लोड- सोयगाव तालुक्यातील पोलीस पाटील पदांचे आरक्षण सोडत जाहीर ; २३ गावात होणार भरती
सोयगाव, बाळू शिंदे, दि.१५... सोयगाव तालुक्यातील २३ गावांना पोलीस पाटील भरतीची प्रक्रिया उपविभागीय अधिकारी सिल्लोड महसूल अंतर्गत हाती घेण्यात आली असून यासाठी( दि.२०) फेब्रुवारीला पोलीस पाटील पदांची आरक्षण सोडतीची प्रक्रिया सिल्लोड उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी कुलदीप जंगम यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे
सोयगाव तालुक्यात २३ गावात पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे त्यासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे त्यासाठी रिक्त पदे असलेल्या २३ गावात जाहीर प्रगटन चितकविण्यात येऊन( दि.१७) पर्यंत पंचनाम्याचा अहवाल सोयगाव तहसिल कार्यालयात सादर करण्याचा सूचना तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिल्या आहे दरम्यान पोलीस पाटील पदांच्या आरक्षण साठी गावातील लोकसंख्येच्या टक्केवारी व ३० टक्के महिला आरक्षण असे दोन निकष आरक्षण सोडती साठी लावण्यात आले आहे. त्यामुळे (दि.१७) पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून (दि.२०) फेब्रुवारीला पोलीस पाटील पदांचे गावनिहाय आरक्षण काढण्यात येणार आहे.सोयगाव तालुक्यात २३ गावासाठी ही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे....
---सोयगाव तालुक्यात पोलीस पाटील भरती होणारी गावे
निमखेडी, पिंपळवाडी, पिंप्री अंतर, दाभा, बोरमाळ तांडा, घोसला, दस्तापुर, जरंडी, धनवाट, उमरविहिरे, जवळा, पिंप्री (माळेगाव), काळदारी, नायगाव, मोलखेडा, पिंपला, देव्हारी, नांदातांडा, फर्दापुरतांडा, नांदगाव, वरखेडी (खु) पळसखेडा (सा) पळाशी, रवळा या २३ गावात पोलीस पाटील भरती होनार आहे.
No comments:
Post a Comment