जलयुक्त शिवार योजनेचा बिगुल ; गावांची निवड अंतिम टप्प्यात !
सोयगाव, बाळू शिंदे, दि.१५... अनेक कारणांमुळे महाविकास आघाडी सरकारने थांबविलेली जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा एप्रिल मध्ये शुभारंभ होणार असून त्यासाठी मंगळवारी (दि.१४) उपविभागीय अधिकारी कुलदीप जंगम यांनी यंत्रणांचा आढावा घेत नवीन गावांची निवड करण्याचे निर्देश दिले आहे त्यासाठी जलसंधारण विभागाकडून सोयगाव तालुक्यात गावांची निवड करण्याचे काम सुरु झाले आहे आतापर्यंत जवळपास पाच गावांची नावे समोर आली आहे.
शाश्वत सिंचनासाठी वर्ष-२०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारने जलयुक्त शिवार योजना वर्ष २०१५-१६ पासून सुरू केली सलग चार वर्षे २०१९ पर्यंत ही योजना राज्यात राबविण्यात आली होती सत्तांतर झाल्या नंतर महाविकास आघाडी सरकारने गैरव्यवहाराच्या आक्षेपा खाली ही योजना बंद केली पुन्हा सत्तांतर होऊन सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने ही योजना या वर्षांपासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य समिती गठीत केली.
----योजनेचा सदस्य सचिव बदलला
या योजनेचे मागील चार वर्षे सदस्य सचिव तालुका कृषी विभाग होता मात्र नवीन नियमात सदस्य सचिव बदलला असून जलसंधारण विभागाकडे सदस्य सचिव पद दिले आहे त्यामुळे गावांची निवडीच्या जबाबदारी आता जलसंधारण विभागाकडे असणार आहे...
चौकट--तालुका कृषी विभागाने जलसंधारण विभागाकडे सोयगाव तालुक्यातील पाच गावांची नावे सादर केली असून या नवीन योजनेत यापूर्वी पोकरा,एकात्मिक पानलोट आणि चार वर्षांत झालेल्या जलयुक्त शिवार गावांची नावे वगळता इतर वंचित गावांचा योजनेत समावेश करण्यात येणार आहे सोयगाव तालुक्यात पोकरा योजनेत २५ गावांचा सामावेश असून मागील चार वर्षांत ६३ गावांत जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली आहे तर आठ गावात एकात्मिक पानलोट योजना राबविण्यात आली आहे त्यामुळे आता सोयगाव तालुक्यात नवीन जलयुक्त शिवार साठी गावेच शिल्लक राहिलेली नाही त्यावर तोडगा काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी कुलदीप जंगम यांनी यंत्रणांची आढावा बैठक घेतली यामध्ये कायम दुष्काळ ग्रस्त तीन गावे आणि मध्यम दुष्काळी व तीव्र दुष्काळी अशा गावांची शोध मोहीम हाती घेण्यात येवून गावांची निवड करण्यात येणार असल्याचे तहसीलदार रमेश जसवंत यांनी सांगितले...
------ग्रामसभा व शिवार फेऱ्या
जलयुक्त शिवार योजनेत निवड झालेल्या गावांची यादी पंचायत समिती कडे पाठविण्यात येऊन त्या गावात ग्रामसभा घेऊन ग्रामसभेत शिवार फेऱ्या चे नियोजन करण्यात येणार आहे...
No comments:
Post a Comment