Wednesday, 15 February 2023

संत सेवालाल महाराज जयंतीचे औचित्य साधून श्री बेलेश्वर गोशाळेचे आमखेडा-सोयगाव येथे भूमिपूजन.....

संत सेवालाल महाराज जयंतीचे औचित्य साधून श्री बेलेश्वर गोशाळेचे आमखेडा-सोयगाव येथे भूमिपूजन.....

सोयगाव, (दिलीप शिंदे सोयगाव), दि. १५ : संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा संचलित श्री बेलेश्वर गोशाळेचे भूमिपूजन नारायण महाराज व समाजसेवक एकनाथ बोडखे यांच्याहस्ते दि.१५ बुधवारी करण्यात आले.
     याबाबत सविस्तर माहिती अशी, संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन समाजसेवक एकनाथ बोडखे व नारायण महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.दरम्यान क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था आमखेडा संचलित श्री बेलेश्वर मंदिराच्या बाजूला श्री बेलेश्वर गोशाळेचे भूमिपूजन समाजसेवक एकनाथ बोडखे यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीप इंगळे,उपाध्यक्ष ईश्वर इंगळे, सचिव दिलीप शिंदे, अनिल लोखंडे, शिवाजी मिसाळ,शिवाजी दौड, विनोद वामने,ज्ञानेश्वर गाडेकर, राहुल ढगे आदींसह नागरिक उपस्थित होते.
छायाचित्र ओळ-- श्री बेलेश्वर गोशाळेचे भूमिपूजन करतांना समाजसेवक एकनाथ बोडखे व इतर

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...