Wednesday, 15 February 2023

नांदगाव येथे कृषि विभागामार्फत पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाची जनजागृती !

नांदगाव येथे कृषि विभागामार्फत पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाची जनजागृती !

नांदगाव, बाळू शिंदे : आज दिनांक – १५/०२/२०२३ रोजी संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची जयंती असल्याने ग्रामपंचायत नांदगांव येथे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व निगडीत यंत्रणा व ग्रामस्थ यांचे मार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. 

आजच्या कार्यक्रमात कृषि विभाग व आत्मा यंत्रणा सोयगांव यांचे मार्फत शेतकरी वर्गाला अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सन २०२३ अंतर्गत पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व, महाडीबीटी योजना, पिक विमा योजना, पोक्रा योजना, शेतकरी गट संघटन व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी मार्गदर्शन करून कामगंध सापळे यांचा वापर करणे या विषयीचे प्रात्यक्षिक दाखवून तृणधान्ये लागवड तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धन याविषयीच्या पुस्तकाचे शेतकरी वर्गाला वाटप करण्यात आले. 

आजच्या कार्यक्रमात एच. बी. देशमुख कृषि पर्यवेक्षक सोयगाव यांनी  महाडीबीटी योजना, पिक विमा योजना यांची माहिती देऊन कामगंध सापळे वापर करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच ए. एस. महाजन बी. टी. एम, सोयगांव यांनी शेतकरी गट संघटन व त्याचे फायदे, गट संघटन करीता आवश्यक कागदपत्रे आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती तसेच सदरील योजनेत करता येणाऱ्या उद्योग याबाबत माहिती दिली. बी. ए. वायकर कृषि सहाय्यक, नांदगाव यांनी पोक्रा योजना, पौष्टिक तृणधान्य रोजच्या आहारात सेवन केल्याने होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन केले.

आजच्या कार्यक्रमास अनमोल केदार पोलिस निरीक्षक सोयगांव, एच. बी. देशमुख कृषि पर्यवेक्षक सोयगाव, ए. एस. महाजन बी. टी. एम सोयगांव, बी. ए. वायकर कृषि सहाय्यक नांदगाव, समाधान मोर ग्रामसेवक नांदगाव, ललित पाटील तलाठी  नांदगाव तसेच गावाचे  सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, प्रगतीशील शेतकरी, कृषि मित्र व गावातील ग्रामस्त उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नवनिर्माण महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.संतोष खरे यांना पीएच.डी.पदवी प्रदान !!

नवनिर्माण महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.संतोष खरे यांना पीएच.डी.पदवी प्रदान !! मुंबई (शांताराम गुडेकर)           ...