मोर्हांडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा समाधान कारक - प्रदिप वाघ
जव्हार, जितेंद्र मोरघा -
मोखाडा तालुक्यातील मोर्हांडा प्राथमिक आरोग्य केंद्राला उपसभापती प्रदीप वाघ यांनी भेट दिली, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सोयी सुविधा ची माहिती घेतली, औषधे साठा, तपासणी सुविधा समाधान कारक दिसल्याने हा आदर्श इतर वैद्यकीय अधिकारी यांनी घ्यावा असे मत प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ देसले, पत्रकार हनिफ शेख, पवार सर, विठ्ठल गोडे, नंदकुमार वाघ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment