Wednesday, 15 February 2023

निलेश मुरलीधर व्यवहारे यांची श्रमिक विकास संघटन (लेबर ट्रेड युनियन) च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती !

निलेश मुरलीधर व्यवहारे यांची श्रमिक विकास संघटन (लेबर ट्रेड युनियन) च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती !

कल्याण, प्रतिनिधी : आम आदमी पार्टीच्या अंतर्गत असलेल्या श्रमिक विकास संघटन (लेबर ट्रेड युनियन) च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी शनिवारी दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ रोजी निलेश मुरलीधर व्यवहारे यांची नियुक्ती करण्यात आली.

निलेश मुरलीधर व्यवहारे आज अनेक वर्षे मा. अरविंद केजरीवालजी च्या आम आदमी पार्टी चे विचार व आदर्श यामुळे प्रभावित होऊन अनेक वर्ष कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याला पाहून श्रमिक विकास संघटन (लेबर ट्रेड युनियन) च्या कल्याण शहराध्यक्ष पदी तर आता महाराष्ट्र राज्य - उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.

यावेळी आप पक्षाचे कार्यकर्ते, युनियनचे पदाधिकारी व आप रिक्षा टॅक्सी वाहतूक संघटनेचे कार्यकर्ते या सर्वांनी उपस्थित राहून श्री. निलेश मुरलीधर व्यवहारे यांचे अभिनंदन व सत्कार केला.

No comments:

Post a Comment

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !!

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !! उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस...