Friday, 10 February 2023

वेरुळ -अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे तिकीट दर निश्चित !

वेरुळ -अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे तिकीट दर निश्चित !

          औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि  १० :   पर्यटनाला चालना देणारा वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल येथे होणार आहे. या महोत्सवासाठी नेमण्यात आलेल्या संयोजन समिती मार्फत तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. सिल्वर-150 रुपये, गोल्ड-300 रुपये, प्लॅटीनिअम -600 रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे तीन दिवसासाठी हे दर लागू राहतील. जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यालय आणि संत एकनाथ रंगमंदिर येथे तिकीट उपलब्ध असणार आहेत.

          तरी या महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा शहरवासी तसेच शहरात येणाऱ्या सर्व पर्यटकांनी आनंद  घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासन, संयोजन समिती तसेच पर्यटन संचालनालयाव्दारे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...