Friday, 10 February 2023

कल्याण तालुक्यातील वेहळे येथील काँक्रीटच्या बंधाऱ्याला' तक्रारींचा, बांध, निविदा रद्द करण्यासाठी अंदोलनाचा इशारा !

कल्याण तालुक्यातील वेहळे येथील काँक्रीटच्या बंधाऱ्याला' तक्रारींचा, बांध, निविदा रद्द करण्यासाठी अंदोलनाचा इशारा !

कल्याण, (संजय कांबळे) ::कल्याण आणि शहापूर या दोन तालुक्याच्या सरहद्दीवर वसलेल्या वेहळे गावात वनविभागाने सिंमेट काँक्रीटचा बंधारा बांधण्यासाठी निविदा काढल्या होत्या, हे काम सुशिक्षित बेरोजगार असलेल्या एका ठेकेदाराला मिळाले आहे. परंतु अडीच महिने झाले तरी अद्यापही त्यांनी काम सुरू न केल्याने ही निविदा रद्द करावी अशी मागणी वेहळे ग्रामस्थांनी वनविभागाचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांच्याकडे केली आहे असे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

कल्याण तालुक्यातील वेहळे येथे क न ८४३ येथे वनविभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेतून १७ लक्ष ७९ हजार ९३८ रुपये अंदाजपत्रकीय असलेल्या सिमेंट काँक्रीट बंधाऱ्याचे काम एका सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना देण्यात आले आहे. संबंधित ठेकेदाराने कार्यारंभ आदेश घेऊन आज अडीच ते तीन महिने होत आहे. नियमानुसार आदेश मिळाल्यापासून ४५ दिवसात काम सुरू करावयाचे आहे. पण तसे होत नाही. कमी दराने निविदा भरून ही काम वेळेत पूर्ण होत नाही म्हणून या ठेकेदाराची निविदा रद्द करण्याची मागणी वेहळे ग्रामस्थांनी ठाणे वनविभागानचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते, तसेच कल्याण रेंज आँफिसर चन्ने यांच्या कडे केली आहे.

दरम्यान तालुक्यातील वेहळे येथे होणारा नियोजित काँक्रीट चा बंधारा हा योग्य ठिकाणी आहे का ? यामुळे पाणी किती प्रमाणात साठवण होणार आहे याचाही विचार करायला हवा. यातून भुजल पातळीत वाढ होईल का ? आजुबाजुच्या शेती, जनावरे यांना या बंधाऱ्याचा कितपत फायदा होईल हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीचा वनविभागाच्या वरीष्ठ अधिकां-यानी गंभीरपणे विचार करून ही निवीदा तात्काळ रद्द करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

No comments:

Post a Comment

वरप ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग? नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

वरप ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग? नागरिकांचे आरोग्य धोक्यात !  कल्याण, राजेंद्र शिरोशे : कल्याण तालुक्यात वरप ग्राम...