कल्याण (प.) येथे सायबर क्राईम मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम संपन्न !
कल्याण, प्रतिनिधी, दि. ९ : कल्याण पश्चिम येथील नूतन विद्यालय व महात्मा फुले पोलिस स्टेशन यांनी नूतन विद्यालय येथे विद्यार्थी, पालक व शिक्षक या सर्वांसाठी सायबर क्राईम मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता.
सायबर सुरक्षा तज्ञ धर्मेंद्र नलावडे यांनी सायबर क्राईम पासून आपला बचाव कसा करावा तसेच सायबर क्राईम म्हणजे काय, इंटरनेट वापरताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, सायबर गुन्हेगार हा आपल्या पर्यंत कसा पोहचतो, शाळेच्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी सोशल मीडियाचा वापर कितपत आणि कसा करावा, मोबाईल संबंधित होणारे सायबर गुन्हे. यावर सखोल मार्गदर्शन केले ज्यामुळे आपण सर्वांनी सायबर क्राईम न होण्यासाठी काय सुरक्षा घेतली पाहिजे या विषयावर सुध्दा मार्गदर्शन केले.
यावेळी महात्मा फुले पोलिस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सुध्दा समाजामध्ये होणाऱ्या गुन्ह्यांविषयी सर्वांना माहिती दिली व सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले.
महात्मा फुले पोलिस स्टेशन तर्फे पाटील साहेब, माळी मॅडम, देसाई साहेब तर शाळेतर्फे मुख्याध्यापिका, गाडगीळ सर, सर्व शिक्षक तसेच सुयश इन्फो सोल्युसन्स तर्फे वकील श्वेता बाबर, चैताली निरगुडे व राजस पवार उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापिका, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती लक्षणीय होती, कार्यक्रमाला खूप छान प्रतिसाद मिळाला.
No comments:
Post a Comment