Monday, 13 February 2023

खोडाळा येथे आधारकार्ड केंद्र सुरु करा - प्रदिप वाघ

खोडाळा येथे आधारकार्ड केंद्र सुरु करा - प्रदिप वाघ

जव्हार, जितेंद्र मोरघा :-

मोखाडा तालुक्यातील खोडाळा हे बाजारपेठ व तालुक्या पासुन 20 कि.मी.अंतरावर असुन, या परीसरातील नागरीकांना आधारकार्ड काढणे,नावात दुरुस्ती करणे, इत्यादी कामा साठी मोखाडा, किंवा नाशिक जिल्ह्यातील घोटी इगतपुरी या ठिकाणी जाव लागते, नागरिकांना आधारकार्ड प्रत्येक गोष्टीत अनिवार्य करण्यात आले असताना देखील शासन आधारकार्ड सेटंर निर्माण करत नसल्याने नागरिकांनी नवीन आधार कार्ड सेंटर सुरू करण्यासाठी जोरदार मागणी केली आहे.

आज उपसभापती प्रदीप वाघ यांनी देखील मोखाडा तहसीलदार यांना पत्र देऊन मागणी केली आहे. या आधी देखील जिल्हाधिकारी कार्यालया कडे मागणी केली असल्याचे प्रदीप वाघ यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...