महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब व खासदार मा.श्री.डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वसई तालुक्यात जिजाऊ संस्थेच्या वतिने विविध उपक्रम..
वसई, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. श्री.एकनाथजी शिंदे साहेब व खासदार मा.श्री.डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन वसई तालुक्यात निलेश सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून शनिवार पासुन 15 दिवस विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर स्वच्छता मोहिम, करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. शनिवारी व रविवारी नवजीवन शांती नगर येथे सर्व सामान्य नागरीकांचे मोफत बँक खाते उघडण्यात आले.
वसई तालुक्यातील नाईक पाडा येथे मोफत आयुष्यमान कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 60 नागरीकांना मोफत आयुष्यमान कार्ड काढुन देण्यात आले. वसई येथिल काटेलापाडा जिल्हा परिषद शाळा, भारोल केलीचा पाडा, पारोळ, देपिवली, माजीवली येथे स्वच्छता अभियान उपक्रम राबवण्यात आला.
यावेळी आरोग्य व बांधकाम सभापती संदेश ढोणे, तालुकाप्रमुख हर्षालीताई खानविलकर, स्वयंसेवक तृप्ती जोशी, उन्मिका पाटील, उमेश घरत उपस्थित होते.
No comments:
Post a Comment