Sunday, 12 February 2023

तथागत भगवान गौतम बुध्दाच्या अस्थिंचे खडवली पडघा रोडला भव्य स्वागत !

तथागत भगवान गौतम बुध्दाच्या अस्थिंचे खडवली पडघा रोडला भव्य स्वागत !

कल्याण, (संजय कांबळे) : तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या थायलंड वरून आणलेल्या अस्थिंचे खडवली पडघा रोड जवळ फुलांनी व तथागत भगवान गौतम बुध्दाच्या जयघोषाने भव्य असे स्वागत करण्यात आले.

तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या अडीच हजार वर्षांपूर्वी च्या अस्थि थायलंड येथून एकूण 110 भत्तेंजी घेऊन पदयात्रा सुरू केली आहे, सदर अस्थि परभणी येथे आणण्यत आलेल्या आहेत व तेथून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली, 17 जानेवारी रोजी पदयात्रा सुरू झाली असून 15, फेब्रुवारी रोजी दादर चैत्यभूमी येथे पोहचणार आहे.

तथागत भगवान गौतम बुध्दाच्या अस्थिंचे प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव स्वागत करीत आहेत, तसेच अस्थिंचे दशैन घेत आहेत.

12 फेब्रुवारी रोजी खडवली पडघा रोडला अस्थिंचे बौध्द बांधवानी भव्य स्वागत फुलांच्या वषौवाने केले, तसेच अस्थिंचे दशैन घेतले, खडवली, आन्हे, वांद्रे, राया, निंबवली, पंचक्रोशीतील असंख्य बौद्ध बांधव तसेच महिला सह मुले हि उपस्थित होते,

या अगोदर वाशिद, भिवडी, शहापूर येथेही मोठ्या उत्साहाने या यात्रेचे स्वागत करण्यात आले, याकरिता शेरे, वाशिद, देवगाव, मुरबाड, वेळे, आदी परिसरातून बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !!

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : पोसरी ठाकूरवाडी येथील रायगड जिल्हा प्राथमि...