गण गण गणात बोते..!
शेगांव चे संत गजानन महाराज यांचा आज प्रकट दिन .....
माघ वद्य सप्तमीला वर्हाड प्रांतातील खामगाव तालुक्यातील शेगाव येथील पातुरकरांच्या घरी मुलाची ऋतुशांती होती. त्यामुळे तेथे पंगती उठत होत्या. त्यानंतर उष्ट्या पत्रावळी उकिरड्यावर टाकल्या जात होत्या. दुपारची वेळ होती. अचानक एक तेजस्वी तरुण तेथे अवतरला अन् पत्रावळीतील अन्नपदार्थ खाऊ लागला. त्याच्या अंगावर वस्त्रही नव्हते. त्याच्याजवळ एक तुंब आणि मातीची चिलम होती. चेहर्यावर समाधान, शांती होती. तितक्याच या रस्त्याने बंकटलाल अगरवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी जात असताना त्यांचे लक्ष या तरुणाकडे गेले. त्याला बघून हा कुणीतरी विक्षिप्त असावा, असे ते म्हणाले. पण त्याची मुद्रा पाहून कोणीतरी साधूपुरुष असावा, असे त्यांना वाटले. त्यांनी पातुरकरांकडून पंचपक्वान्नांनी भरलेले ताट आणून त्या तरुणासमोर ठेवले आणि खाण्याचा आग्रह केला. त्याने ते खाल्ले आणि गायीसाठी ठेवलेले पाणी तो पिऊ लागला. त्यावर दामोदरपंत कुलकर्णी म्हणाले, की ते पाणी घाण आहे, ते पिऊ नका. त्यावर तरुणाने उत्तर दिले, की घाण व स्वच्छ पाणी दोन्ही सारखेच. उष्टे, खरकटे व पंचपक्वान्ने हे एकच. सर्व सृष्टीत परमेश्वर आहे. हे ऐकताच बंकटलालांची खात्री पटली, की कोणीतरी साधूपुरुष आहे. ते दोघे त्याचे पाय धरण्यासाठी धावले. मात्र, ते अदृश्य झाले. हे साधूपुरुष म्हणजेच संत गजानन महाराज. ते त्या दिवशी शेगावात अवतरले. हा दिवस म्हणजेच शके 1800 मधील माघ वद्य सप्तमी. ते गूढी, परमहंस संन्यासी, जीवनमुक्त असे संत होते. त्यांनी समाजाला ‘गण गण गणात बोते’ हा मंत्र दिला.
शेगावीचे योगीराणा तथा महान साधूपुरुष
संत गजानन महाराज यांचा आज प्रकट दिन
शब्दांकन - अखलाख देशमुख, औरंगाबाद
No comments:
Post a Comment