औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १३ : हर्सुल... जळगाव हायवे रस्ता शंभर फुट रुंदीकरण करण्यासाठी मनपा व जिल्हा प्रशासनाने सकाळी 9 वाजेपासून मोठ्या पोलिस बंदोबस्तात कार्यवाही सुरू केली आहे. वाहतूक सावंगी पासून केंब्रिज शाळा रस्त्यावर वळवण्यात आली आहे.
नेहमी या रस्त्यावर वाहतूकीसाठी खोळंबा होत होता आता वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. हर्सुल गावातील 95 मालमत्ता प्रशासनाने रस्ता रुंदीकरणासाठी भुसंपादीत केली आहे. यावेळी मनपा, जिल्हा प्रशासन, अतिक्रमण विभाग, पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित आहेत.
No comments:
Post a Comment