ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीत शेती आणि फळ पिकांबाबत चर्चा !
पुणे, अखलाख देशमुख, दि १५ : देशाचे माजी कृषीमंत्री, ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची पुणे येथे अर्जुन खोतकर यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत मराठवाड्यातील शेतीविषयक प्रश्नांवर चर्चा झाली. प्रामुख्याने मोसंबी फळ शेती आणि बाजारपेठेबाबत तसेच प्रक्रिया उद्योगाबाबत तपशीलवार चर्चा झाली.
समृद्धी महामार्गाचा शेतकऱ्यांना होणारा फायदा, साखर उद्योग, ड्रॅगन फ्रुट व सोयाबीन हरभरा या पॅटर्नबाबतही चर्चा झाली. या भेटीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कृषी भूषण विजय आण्णा बोराडे यांची आवर्जून आठवण काढली. जालना जिल्ह्यातील मोसंबीचे पीक घेणाऱ्या विशेष गावांबद्दलची माहितीही पवार साहेबांकडून ऐकायला मिळाली. तसेच कडवंची येथील द्राक्ष शेतीबद्दलही माहिती जाणून घेतली. जालन्यासह मराठवाड्यातील सिंचन आणि शेती विषयक चर्चा या भेटीत झाली.
यावेळी शेतीनिष्ठ शेतकरी तथा उद्योजक दिलीप आबा तुपे, इंद्रजीत तुपे, महेश जाधव, बिपिन मोदी आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment