Wednesday, 15 February 2023

क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस महापौर सौ. जयश्री महाजन यांच्या हस्ते माल्यार्पण !

क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस महापौर सौ. जयश्री महाजन यांच्या हस्ते माल्यार्पण !

जळगाव, अखलाख देशमुख, दि १५ :  बंजारा समाजाचे आद्यदैवत, थोर समाजसुधारक क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्या 284 व्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेतर्फे बुधवार, दि.15 फेब्रुवारी 2023 रोजी शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या संचालिका तसेच जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी महापालिकेतील नगरसेवक नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे,सुनील खडके, नगरसेविका सौ.सीमा भोळे, सौ.लता भोईटे, सौ.रेखा पाटील, सौ.अंजना सोनवणे, सौ.सरिता नेरकर, ऍड. सौ. शुचिता हाडा यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. सौ. विद्या गायकवाड, उपायुक्त गणेश चाटे, शहर अभियंता चंद्रकांत सोनगीरे व महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...