कव्वाली ने बांधला समाँ आमखास मैदानावर पूर्वरंग !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २१ : वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित पूर्वरंग मध्ये आज आमखास मैदानावर कव्वाली ने रंग भरला आणि शहराच्या गंगा जमना तहजीब ला नव्याने उजाळा मिळाला. पूर्वरंग चा चौथा कार्यक्रम आज जल्लोषात साजरा झाला.
मैफलीचा आगाज झाला..दर मे आया हुं बनकर सवाली म्हणत झालेली सुरुवात आणि मैफल हळू हळू रंगत गेलीं
आमेर उर झामा आणि साथीदारांनी मैफल रंगवली आणि आमखास ची संध्याकाळ रोशन झाली.
प्रारंभी अबू बकर यांनी कव्वाली सुफी चा इतिहास आणि उगम यावर निवेदन केले. यावेळी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक श्रीमंत हारकर आणि उपसंचालक विजय जाधव यांनी कलाकारांचे स्वागत केले. यावेळी याहया खान, शेख आमिर बाबा बेकर्स, राहुल खरे आणि अनेक रसिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment