Tuesday, 21 February 2023

नालासोपारा समेळगावातील उघड्या विद्युत डि पी मुळे शाळेतील मुलांचे जीव धोक्यात - *रूचिता अमित नाईक, शिवसेना महिला आघाडी शहर संघटक*

नालासोपारा समेळगावातील उघड्या विद्युत डि पी मुळे शाळेतील मुलांचे जीव धोक्यात - *रूचिता अमित नाईक, शिवसेना महिला आघाडी शहर संघटक* 

वसई, प्रतिनिधी : नालासोपारा (पश्चिम) समेळगाव येथे लिटील फ्लॉवर स्कुल च्या रस्त्यालगत उघड्या विद्युत डि पी मुळे शाळेत ये जा करणाऱ्या मुलांचा जीव धोक्यात असल्याने वारंवार तक्रार देऊनही कुणीच दखल घेत नसल्याने एम ए सी बी कर्मचारी व अधिकारी हे थकलेली बीज बीले व वीज कनेक्शन कट करण्यात व्यस्त असल्याने आमची तक्रार गांभिर्याने कोणी घेत नसल्याची तक्रार स्थानिक नागरीकांनी रूचिता नाईक यांच्याकडे केली आसुन शाळेत व मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी एकमेव रस्ता असल्याने याच उघड्या डि पी जवळुन जावे लागते. एखादवेळी दुर्लक्ष झाल्यास लहान मुले डि पी जवळ जाण्याचा धोका असतो. याठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याचे गरजेचे आहे.

यासंदर्भात स्थानिक रहिवाशांनी संबंधित यंत्रणांकडे वारंवार तक्रारी केल्या. पण, कुणीही दाद देत नाही. जबाबदारी ढकलण्याचाच प्रयत्न केला जातो. या प्रकाराने नागरिक संतप्त असून प्रशासन दुर्घटनेची वाट बघत आहे काय?, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.स्थानिक रहिवाशांकडून धोकादायक स्थितीबाबत वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या. पण, कुठूनच दाद मिळत नाही. सुदैवाने अद्याप दुर्घटना घडली नसली तरी धोका कायम आहे.दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कर्मचारी व अधिकारी असतील अशी तक्रार शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...