Tuesday, 21 February 2023

चिराग आनंद, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांनी रुग्णांला मिळवून दिली हॉस्पिटलच्या बिलात वीस हजार रुपयांची सुट !

चिराग आनंद, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांनी रुग्णांला मिळवून दिली हॉस्पिटलच्या बिलात वीस हजार रुपयांची सुट !

कल्याण, प्रतिनिधी : कल्याण पश्चिम, योगीधाम सोसायटीतील रहिवासी रंजित महाजन हे आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी एम्स हॉस्पिटल, डोंबिवली येथे ॲडमिट केले होते, त्यावेळी त्यांच्या पत्नी रुपाली महाजन यांनी त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने हॉस्पिटलच्या बिलासंदर्भात मा. नगरसेवक व शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चिराग आनंद, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष (विधानसभा समन्वयक, कल्याण) यांच्याशी संपर्क साधावा असे सांगून त्यांचा नंबर दिला, सदर कुटुंबियांच्या संपर्कानंतर चिराग आनंद यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मा. आमदार विश्वनाथ भोईर (कल्याण), मंगेश चिवटे (कक्ष प्रमुख, विशेष कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय), मा.रवी पाटील (शहर प्रमुख, कल्याण), राम राऊत (कक्ष प्रमुख, महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातुन.. रंजित महाजन (पेशंट) यांना एम्स हॉस्पिटल, डोंबिवली येथील हॉस्पिटलच्या बिलात २०,०००/- रुपयांची सुट मिळवून दिली.

पेशंट व त्यांच्या नातेवाईकांनी‌ मा. एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), मा.खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व संपूर्ण टीमचे आभार मानले आणि आभार पत्र दिले..

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...