कोकणातील लांजा तालुक्याच्या सुपुत्राने (जिल्हा रत्नागिरी) नॅशनल पावर लिफ्टिंग स्पर्धे मधून महाराष्ट्रासाठी आणली २ सुवर्ण पदके !
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
कु. सुशांत सोनू आगरे याने छत्तीसगड (भिलाई) येथे १७ फेब्रुवारी २०२३ ते २१ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत ६२ किलोग्रॅम वजनी गटामध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळत असताना दोन सुवर्ण पदक पटकावली.१८ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या क्लासिक पॉवरलिफ्टींग स्पर्धेत ४४७.५ किलोग्रॅम वजन उचलून पहिलं सुवर्ण पदक पटकावले, तसेच २० फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या इक्विप पॉवरलिफ्टींग स्पर्धेत ४४५ किलोग्रॅम वजन उचलून दुसरे सुवर्ण पदक पटकावले.
विशेष म्हणजे या राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुशांत सोनू आगरे याची दोन वेळा बॉडी वजन घेण्यात आली. १८ फेब्रुवारी ला झालेल्या क्लासिक पॉवरलिफ्टींग स्पर्धेचे बॉडी वजन १७ फेब्रुवारी ला घेतलं आणि या स्पर्धेत महाराष्ट्र संघाला पहिलं सुवर्ण पदक पटकावून दिलं. तसेच २० फेब्रुवारी ला झालेल्या इक्वीप पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी बॉडी वजन त्याच दिवशी घेण्यात आले. दोन दिवसाच्या कालावधीत सुशांत सोनू आगरे याच बॉडी वजन वाढलं होत आणि या स्पर्धेसाठी त्याला ६२ किलोग्रॅम वजनी गटामध्ये खेळायच होत त्याने वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि ध्येय आणि चिकाटी त्याने सोडली नाही. आणि २० फेब्रुवारी ला ६२ किलोग्रॅम वजनी गटामध्ये खेळून दुसरे सुवर्ण पदक पटकावले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा लांजा तसेच कोकणातील अनेक सामाजिक कार्यकर्ता आणि मंडळ पदाधिकारी, सदस्य, सभासद यांनी त्यांना अभिनंदन सह शुभेच्छा देत कौतुक केले आहे.
No comments:
Post a Comment