Tuesday, 14 February 2023

बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनचा नाविन्यपूर्ण उपक्रम !

बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनचा नाविन्यपूर्ण उपक्रम !

*सहावी ते बारावीपर्यंतच्या मुलींना शाळेत मोफत सॅनिटरी पॅड वाटप*

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १५ :  शहरातील खाजगी शाळेतील इयत्ता 6 ते 12 पर्यंतच्या मुलींना आदित्य बिर्ला फाउंडेशनच्या माध्यमातून औरंगाबाद येथील एनजीओ बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन व मुंबई येथील मेकिंग द डिफरन्स चारिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता सातवी ते बारावी पर्यंतच्या वयोगटातील मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन किट पहिल्या दिवशी नक्षत्रवाडी येथील संत कबीर विद्यालय येथे 250 मुलींना तर भीमनगर भाऊसिंगपुरा येथील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले माध्यमिक विद्यालय येथे 200 मुलींना योग्य मार्गदर्शन करून सॅनिटरी नॅपकिन किटचे मोफत वाटप करण्यात आले.तर दुसऱ्या दिवशी न्यू हनुमान नगर येथील सुधाकरराव नाईक माध्यमिक विद्यालयांमध्ये 165 मुलींना तर  शिवाजीनगर येथील कलावती माध्यमिक व  उच्च माध्यमिक विद्यालय येथे 300 मुलींना डॉ जया चाबुकस्वार, डॉ प्रवीण चाबुकस्वार, रामदास वाघमारे, प्रदीप विश्वकर्मा, यांच्या हस्ते मोफत  किटचे वाटप करण्यात आले. 

कष्टकऱ्याच्या वसाहतीमधील शेवटचे सेशन म्हणून आंबेडकर नगर येथील संत तुकाराम माध्यमिक विद्यालय येथे 50 महिलांना तर आनंदनगर गारखेडा परिसर या भागामध्ये 300 महिलांना आदित्य बिर्ला फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत सॅनिटरी पॅडच्या किटचे मोफत वाटप करून आरोग्या संदर्भात डॉ आस्ता दुबे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी सॅनिटरीनॅपकिन किट व पुस्तक वाटप करण्यात आले. मंगळवार व बुधवार रोजी दोन सेशन मध्ये कष्टकरी कामगाराच्या वसाहतीमध्ये पुढील सेशन होणार आहे.असे रामदास वाघमारे यांनी कळविले आहे.

औरंगाबाद येथील बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशनच्या सचिव मीरा वाघमारे, प्रेरणा आझादे, प्रणाली उघडे, व मुंबई येथील मेकिंग द डिफरेंस चँरिटेबल ट्रस्टचे फाउंडर मेंबर प्रदीप विश्वकर्मा, 'लज्जा' प्रोजेक्टच्या मेंबर जागृती गुप्ता, सचिन पासवान, नरेंद्र चौधरी, एनजीओचे फाउंडर मेंबर ऋत्विक वाघमारे, मोहन खंडागळे, निलेश उघडे, सौरव उघडे, गौरव वाघमारे, शुभम साळवे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !!

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !! उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस...