Tuesday, 14 February 2023

निराधार अनुदान; हयात व आधार जमा न केलेल्या एक हजार ५६९ निराधार लाभार्थ्यांना फटका !

निराधार अनुदान; हयात व आधार जमा न केलेल्या एक हजार ५६९ निराधार लाभार्थ्यांना फटका !

सोयगाव, बाळू शिंदे, दि.१४..... संजय गांधी,श्रावण बाळ व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार व हयात प्रमाणपत्र जमा न केलेल्या एक हजार ५६९ लाभार्थ्यांची अनुदानाची रक्कम सोयगावला थांबवून ठेवण्यात आली आहे त्यामुळे शासनाच्या या नविन निर्णयाचा सीयगाव तालुक्यातील एक हजार ५६९ लाभार्थ्यांना सोमवारी फटका बसला आहे.हयात व आधार सीयगव तहसिल कार्यालयात जमा करताच त्या लाभार्थ्यांचे अनुदान जमा करण्यात येईल अशी माहिती नायब तहसीलदार विठ्ठल जाधव यांनी दिली आहे.
    सोयगाव तालुक्यात श्रावण बाळ, संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या तीन महिन्यांच्या अनुदाना ला वितरण सुरू करण्यात आले आहे परंतु दिवाळी पूर्वी शासनाने या पात्र लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र व आधार कार्ड तहसिल कार्यालयात जमा करण्याचा निर्णय घेतला होता यासाठी लाभार्थ्यांनी तीन महिन्यातही अद्यापही सदरील कागदपत्रे जमा न केल्याने यातील एक हजार ५६९ लाभार्थ्यांची अनुदानाची रक्कम थांबविण्यात आली आहे त्यामुळे नवीन निर्णयाचा फटका या लाभार्थ्यांना बसला आहे या लाभार्थ्यांनी तातडीने कागदपत्रे जमा करावी अन्यथा त्यांची अनुदान बंद करण्यात येईल अशी ताकीद तहसिल प्रशासनाने दिली आहे....
-----ऐन दुष्काळात सोयगाव तालुक्यातील सहा हजार पाचशे ९६ लाभार्थ्यांना सोमवार पासून निराधार अनुदान वाटप हाती घेण्यात आले असून या सहा हजार पाचशे ९६ लाभार्थ्यांच्या खात्यात सोयगाव तहसिल कार्यालया च्या निराधार विभागाकडून एक कोटी ९४ लक्ष ६४ हजार इतकी रक्कम खात्यात वर्ग करण्यात आली आहे त्यामुळे संजय गांधी श्रावण बाळ निराधरांना ऐन दुष्काळात आधार मिळाला आहे सोमवार पासून ही मदत तालुक्यात वितरण करण्यात येत आहे...

कोट- १) शासनाच्या निर्णयाप्रमाणे हयात व आधार कार्ड जमा न केलेल्या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान थांबविण्यात आले आहे त्या लाभार्थ्यांनी त्वरित कागदपत्रे जमा करावी आठ दिवसात ही कागदपत्रे जमा करण्यात यावी त्यानंतर त्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात येईल अन्यथा निधीची रक्कम परत करण्यात येईल
    विठ्ठल जाधव
नायब तहसीलदार संजय गांधी

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...