"शेतकरी अपघात विमा योजना" मृत्यू नियमात बसला तरच मिळेल दोन लक्ष रु ; त्रूटी मुळे वारसदार त्रस्त : - सोयगाव तालुक्यातील प्रकार
सोयगाव, बाळू शिंदे, दि १४... गोपीनाथ राव मुंडे अपघात विमा योजनेसाठी प्रस्ताव दाखल झाल्यावर अनेक दिवस त्यावर कारवाई होत नसल्याने सीयगाव तालुक्यातील मृतांचे वारसदार त्रस्त झाले आहेत. कारवाई झालीस तर या प्रस्तावात सातत्याने त्रूटी येत आहे संबंधित शेतकऱ्यांचा मृत्यू योजनेच्या निकषात बसत असेल तरच त्यांच्या वारसाला दोन लाखांची मंदत शासनाकडून मिळत आहे.
शासनाने शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू, साप चावल्याने, झाडावरून पडून अपंगत्व आल्यास त्या वारसांना शासनाकडून आर्थिक मदत मिळते त्या व्यक्तीला गोपीनाथ राव मुंडे अपघात योजनेचा लाभ मिळतो मागील वर्षी अशा २३, घटनांची नोंद सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदी आहेत, त्यापैकी १३ मयताच्या वारस दारांनी यासाठी प्रस्ताव केले आहेत, परंतु तालुका कृषी विभागाच्या उदासीनता मुळे यातील नऊ प्रस्ताव शासनाने नाकारले असून चार प्रस्ताव अद्ययावत विचाराधीन आहे यामध्ये महसूल विभागाची केवळ पंचनामा करून अहवाल कृषी विभागाला पाठवावा लागतो, तालुका कृषी विभागाच्या वतीने मात्र प्रस्ताव करतांना उदासीनता दिसून येते, त्यामुळे कृषी विभागाच्या वतीनं पाठविण्यात आलेल्या दाव्या मध्ये वारंवार त्रुटी असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे मृताच्या वारसदारांना कसरत करावी लागत आहे, या प्रक्रियेमुळे आता वारसदार त्रासले आहे दरम्यान सोयगावला कायम स्वरूपी तालुका कृषी अधिकारी ही नाही त्यामुळे या योजनेबाबत तालुक्यात जनजागृती तर दूरच परंतु अनेकांना अद्यापही या योजनेचे नावही माहीत नाही..
------तलाठ्यांनी या योजनेसाठी केवळ पंचनामे करण्याची भूमिका बजावावी लागते परंतु या पंचनाम्या मध्ये तलाठ्यांच्याही अनेक चुका होत आहे त्यामुळे सीयगाव तालुक्यात सन २०२१-२२ मध्ये एकही वारसदारांना या योजनेची मदत मिळालेली नाही
-----काय आहे योजना
शासनाकडून ही योजना आठ वर्षांपासून सुरू करण्यात आली आहे शेती करतांना अनेक कारणांनी अपघात होतात व यामध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना दोन लक्ष रु पर्यंत मदत मिळत असल्याने दिलासा मिळाला आहे पण सीयगाव तालुक्यात या मदतीपासून दूर ठेवणात आले आहे
-----कोणाला मिळतो लाभ
वीज पडून नैसर्गिक आपत्ती सर्पदंश विंचूदंश,वाहन अपघात, विजेचा शोक लागून शेतकऱ्याचा मृत्यू, शेतकऱ्यांच्या वारसांना दोन लाखाची मदत मिळते....
-----म्हशीकोठा गावातील धरणात पाण्यात बुडुन मृत झालेल्या त्या शेतकऱ्याच्या वारसांना मदत तर दूरच परंतु त्या मृत शेतकऱ्यांचा प्रस्ताव गायब झाला आहे यासाठी कारणीभूत तालुका कृषी विभाग असल्याचे मयताच्या नातेवाईकांनी सांगितले......
No comments:
Post a Comment