Tuesday, 14 February 2023

माळशेज घाटाच्या कुशीत वसलेल्या आवळेगावात आदिवासी व्हाँलीबाँल स्पर्धा, कर्जत मधील डोगरपाड संघास प्रथम पारितोषिक !

माळशेज घाटाच्या कुशीत वसलेल्या आवळेगावात आदिवासी व्हाँलीबाँल स्पर्धा, कर्जत मधील डोगरपाड संघास प्रथम पारितोषिक !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण नगर महामार्गावरील नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या माळशेज घाटाच्या कुशीत वसलेल्या आणि ऐतिहासिक नानेघाटापासून काही अंतरावर असलेल्या आवळेगांव येथे आदिवासी व्हॉलीबॉल स्पर्धा कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या अटीतटीच्या सामन्यात कर्जत मधील डोंगरपाड संघास प्रथम पारितोषिक तर कांडलपोई द्वितीय आणि भक्तांचीवाडीस तिसरे पारितोषिक उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.
प्रथमच होत असलेल्या आदिवासी व्हाँलीबाँल स्पर्धेचे उद्घाटन
.प्रकाश पवार सर.संजयभाऊ पवार,.विलासभाऊ घरत यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले आणि टी शर्ट वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत आयोजक आप्पा कोकणे, इरफान शेख, ऊंद्रू कोकणे, नवसू भला, तुकाराम वाख, ग्रा.पं.सदस्य अनंता भला, भाऊ भला, राजाराम भला, ग्रा.पं.सदस्य वैभव मेंगाळ, रामचंद्र शिंगवा, खंडू मेंगाळ, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

या स्पर्धेत सहभागी सर्वच संघानी चमकदार कामगिरी बजावली. परंतु यातील वरील तीन संघांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांकाचे पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी पत्रकार दीपक चिडा, फांगणे येथील निखिल देशमुख, ग्रामपंचायत मेर्दीचे सरपंच- .पांडूरंग दरवडा, फांगुळगव्हानचे सरपंच रवि भला, सदस्य पंढरीनाथ  साबळे, तानाजी भला, फागुळगव्हाण विठ्ठल भला-  फागुळगव्हाणचे  इतर मान्यवर उपस्थित होते तसेच भोरांडे सदस्य श्री.हेमंत देशमुख, फांगणे येथील अशोक केदार, राजेश केदार, सचिन केदार आदींनी भेट दिली.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...