२८ वी युरो-आशिया इंटरनॅशनल (WFSKO) ओपन कराटे चँम्पियनशिपमध्ये रितिका भोसलेला एक गोल्ड व एक सिल्वर मँडल !
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
प्रियदर्शिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मुलुंड येथे शनिवार दि.११ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या २८ वी युरो-आशिया इंटरनॅशनल (WFSKO) ओपन कराटे चॅम्पियनशिपमध्ये विक्रोळी पार्क साईड येथील डॉ.सुहास भोसले यांची कन्या कु. रितिका सु.भोसले हिने उल्लेखनीय कामगिरी करत कुमिते (फाइट) मध्ये एक गोल्ड व काता मध्ये एक सिल्वर मेडल पटकावले.
स्पर्धेत भारत, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, मॉरिशस, सौदी अरेबिया, नेपाळ, केनिया, उझबेकिस्तान, मलेशिया, पॅलेस्टाईन, इराण, ब्राझील, कुवेत चे खेळाडू सहभागी झाले होते. रितिका हिने १८ वर्षावरील या मुलींच्या वयोगटात हे यश मिळवले. आई.आई.के.एफ.चे कोच फ्राज शेख सर यांच्या मार्गदर्शनखाली तिने ही मँडल जिंकली.आजवर तीने अनेक सुवर्ण, रजत व कास्य पदक मिळवली आहेत. रितिका भोसलेच्या या यशाबद्दल तिला अनेकांकडून अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment