Tuesday, 28 March 2023

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंविरुद्ध अवार्च्य भाषेत टीका केल्याप्रकरणी आमदारांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा !

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंविरुद्ध अवार्च्य भाषेत टीका केल्याप्रकरणी आमदारांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा !

*विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची* पोलीस ठाण्यात तक्रार

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २८ :  - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध अवार्च्य भाषेत टीका केल्याप्रकरणी आमदार संजय शिरसाठ यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशा तक्रारीचे पत्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी औरंगाबाद पोलीस ठाण्यात दिले आहे. 
    २६ मार्च रोजी आमदार संजय शिरसाठ यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध अत्यंत अवार्च्य भाषेत टीका केली असल्याचे माध्यमातून समोर आले. त्यामुळे शिरसाठ यांच्या विरोधात भा.दं. वि. च्या कलम ३५४(अ) अनव्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार दानवे यांनी लेखी स्वरूपात केली आहे.

No comments:

Post a Comment

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट !

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेस ५५ इंची दोन स्मार्ट टेलीव्हिजन संच भेट ! सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील प्...