वंचित बहुजन आघाडीची भीमजयंती 2023 उत्सव समिती नियोजन बैठक संपन्न !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ६ : दिनांक 5/4/2023 रोजी सुभेदारी विश्रामगृह औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त कार्यकारणीच्या वतीने भीमजयंती उत्सव समितीचे नियोजन बैठकीचे आयोजन केले होते. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे आदेशानुसार या वर्षीची भीमजयंती वॉर्ड, तांडे, गांव, शहर, तालुके आणी जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने (संयुक्त कार्यकारणी) साजरी करावी ज्यात गरजूना फळे वाटप, विदयार्थ्यांना पेन, पेन्सिल वाटप, संस्कृतीक कार्यक्रम, शिबीरे जसे रक्त दान शिबीर आयोजित करणे, 18 तास अभ्यास, बाबासाहेब यांचे संघर्षमय जीवनावर भाषणे, निबंध लिहणे असे विविध उपक्रम राबविणे, अशा प्रकारे भीमजयंती साजरी करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
त्यानुसार 132 व्या जयंती साठी 132 फूट लांब 5 फूट उभ्या बॅनर वर बाबासाहेब यांचे वेगवेगळे फोटो आणि असंख्य सुविचार लिहण्यात येतील, क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून रॅली काढण्यात येईल पुढे फुले दामपत्त्यास अभिवादन करून राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करून भडकल गेट येथे बाबासाहेब आंबेडकर यांना अभीवादन करून फळे वाटपाचा कार्यक्रम होईल या रॅली मध्ये अंजली ताई आंबेडकर याची उपस्थिती असण्याची शक्यता आहे.
या बैठकीचे अध्यक्ष योगेश बन होते तर प्रमुख उपस्थिती महिला अध्यक्षा ऍड. लताताई बामने, आणि प्रभाकर बकले यांचे सह जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा पासिद्धी प्रमुख मा. भाऊराव गवई, कोमलताई हिवाळे, महासचिव भय्यासाहेब जाधव, सुलोचना ताई साबळे, रवि रत्नपारखे, राजश्री नवगिरे, पुष्पा घोडके, बाबासाहेब शिंदे, किशोर जाधव, महिंद्र तांबे, सतीश निकम, राहुल गायकवाड, वैजिनाथ रेडेवाड, राजू पगडे, पुरुषोत्तम दाभाडे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment