Tuesday, 25 April 2023

अवैध धंद्यांना पोलिसांचे अभय - *विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र*

अवैध धंद्यांना पोलिसांचे अभय - *विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र*

*औद्योगिक वसाहत क्षेत्रातील अवैध व्यवसायांवर कारवाई करावी*

मुंबई, अखलाख देशमुख, दि २५ -  संभाजीनगर शहरासह वाळुंज, रांजणगाव व पंढरपूर येथील औद्योगिक वसाहतीच्या क्षेत्रात गुटखा विक्री, मटका, लॉटरी, मुरुम चोरी, गावठी दारू, लॉजिंग, वाईन शॉप, बुकी, बिअर शॉप, रेती व्यवसाय व गॅस रिफिलींग आदींचे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असून त्याला पोलिसांचे अभय असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच या अवैध व्यवसायांवर कारवाई करावी अशा मागणीचे पत्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त संभाजी नगर, महासंचालक लाललुचपत विभाग यांना लिहिले आहे. 

औद्योगिक क्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसायिकांकडून पोलीस प्रशासनाकडून वसूली केली जात आहे. त्या संदर्भात आपणांस पुरावे आवश्यक असल्यास मी प्रत्यक्ष पुरावे सादर करण्यास तयार आहे, असे दानवे यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच सदर वसूली करण्यासाठी काही दलाल लोकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे सुरेश जैस्वाल, योगेश पवार व अतुल चक्क हे खाजगी व्यक्ती पोलीसांची कोणती कामे करत आहेत याबाबत चौकशी करण्यात यावी. या प्रकरणी प्रत्यक्ष लक्ष घालून संबंधितांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई, अशी मागणी देखील दानवे यांनी केली आहे. 

अवैध व्यवसाय व त्यातून जमा होणारी वसुली रक्कम खालीलप्रमाणे ..‌‌‌‌‌...

‌गुटखा  ९ लाख ४० हजार रुपये
गावठी दारू 3 कोटी १ लाख ४० हजार रुपये
गावठी दारू ९ लाख ८० हजार रुपये
मटका १२ लाख रुपये 
जुगार ३ लाख रुपये
वाईन शॉप २ लाख ६० हजार रुपये
मुरूम तस्कर ४ लाख रुपये
रेती कलेक्शन १६ लाख ७५ हजार
गॅस रिफलिंग १ लाख ५० हजार

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...