कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करा - *कृषिमंत्री अब्दुल सत्तार*
मुंबई, अखलाख देशमुख, दि २४ कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबत आज मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर, यांच्यासमवेत सविस्तर चर्चा करण्यात आली. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असून यासंदर्भातील अहवाल शालेय शिक्षण मंत्री ना.दीपक केसरकर यांच्याकडे आज सुपूर्त करण्यात आला.
कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ई. मु. काझी, सहसचिव (कृषी) बाळासाहेब रासकर, महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी संचालक (शिक्षण) प्रा. डॉ. उत्तम कदम, संचालक (संशोधन) डॉ. हरिहर कौसडीकर, अवर सचिव उमेश चांदिवडे आदींची यावेळी उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment