Tuesday, 11 April 2023

महाराष्ट्र योगशिक्षक संघ, वर्ष २०२३-२४ साठी मुंबई जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर !

महाराष्ट्र योगशिक्षक संघ, वर्ष २०२३-२४ साठी मुंबई जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर !

*ठाणे : उदय दणदणे*

        महाराष्ट्र योगशिक्षक संघ ही संघना ही महाराष्ट्रातील योगशिक्षकांसाठी काम करणारी एकमेव संस्था असून ,देशात असो वा राज्यात अशा अनेक संस्था आहेत की ते योगशिक्षक घडवता, तयार करतात. मात्र  त्यांना योग्य ते मार्गदर्शन किंवा सर्टिफिकेशन झाल्यानंतर क्लास कसे घ्यायचे किंवा योगा शिकविण्याचा प्रोटोकॉल कसा असावा, साधारण फी किती आकारावी यावर सखोल माहिती महाराष्ट्र योगशिक्षक संघ ही संघटना योगशिक्षकांना देते, तसेच महाराष्ट्र योगशिक्षक संघातर्फे राज्य सरकारकडे योगशिक्षकांच्या हितासाठी काही मागण्या संघटनेने लावून धरल्या आहेत, जसे की शाळा व महाविद्यालयात योग विषयाला सुद्धा मान्यता द्यावी, महाराष्ट्र मधील प्रत्येक जिल्ह्यात आरोग्यवर्धनी मार्फत योगसत्र घेणाऱ्या शिक्षकास नियमित करावे, शासकीय व निमशासकीय अस्थापनेमध्ये योगा ब्रेक नियमित करावा यासाठी योगतज्ञ नेमावा, योग विषयास सेट (SET) परीक्षेत सामील करावे, महाराष्ट्र पोलीस खात्यात योगशिक्षक नेमावे, जिल्हा व सामान्य रुग्णालयात योग थेरपिस्टच्या जागा भराव्यात, योग विषयाला पूर्णतः अनुदानित करावे, मराठी साहित्य संमेलन प्रमाणे दरवर्षी योग संमेलन शासनाने आयोजन करावे असे एकूण १२ मागणी सदर संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
      महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ मनोज निलपवार  हे सतत याचा पाठपुरावा करत असून त्यांच्याच  मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांची कार्यकारणी तयार करण्यात आली आहे त्यात मुंबई जिल्हा कार्यकारणी पुढीलप्रमाणे आहे.अध्यक्ष-मुंबई जिल्हा- संतोष म. खरटमोल उपाध्यक्ष- हेमवंता जिजाबाई, रेश्मा धुरी पाटील, श्वेता पिसाळ, साक्षी कलगुटकर सचिव- सुषमा माने, अमित चिबडे, वर्षा शर्मा,  विजयालक्ष्मी शर्मा महासचिव- प्रसाद काठे कोषाध्यक्ष- रिद्धी देवघरकर  संघटन सचिव- विकास ओव्हाळ  मीडिया प्रभारी- निलेश साबळे सोशल मीडिया प्रभारी- प्रशांत मकेसर कार्यालय सचिव - जयदीप कनकिया महिला प्रकोष्ट प्रभारी- डॉ. पौर्णिमा काळे, ईश्वरी शिंदे लीगल सेल प्रभारी- ऍड. माया देसाई  विशेष सदस्य- सागर शितकर, पूजा कुसनुरे, रुद्रा दातखिळे, दीपा सोलंकी, स्फुर्ती जेधे, अक्षता अरोलकर, मनोज दुबे, जिनेश राजपूत, रितेश यादव, सुनीता महाडिक, हरेश सोलंकी, देवांग शाह, कृष्णकुमार शिंदे, रुपेश मयेकर, मुग्धा मयेकर, तन्वी पालशेतकर, सुनील बिदलान, ब्रिजेश मिश्रा, अजय कुंभार, निर्मला पारघी, बापू चव्हाण, शर्मिला चंदा, शीतल सिंग, सुवर्णा पोटे, उमेश मस्कर, ज्ञानेश्वर सिंग आदींची मुंबई जिल्हा अध्यक्ष संतोष म. खरटमोल व मुंबई जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रसंगी महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ मनोज निलपवार व कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी तसेच सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी मुंबई जिल्हा कार्यकारणीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...