Wednesday, 12 April 2023

भाजपच्या वतीने महापुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता !

भाजपच्या वतीने महापुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता !

भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या नेतृत्वात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौरव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे, त्या अंतर्गत शहरांमधील महापुरुषांच्या पुतळ्याची परिसराची साफसफाई व स्वच्छता अभियान आज भारतीय जनता पार्टीने वार बुधवार दिनांक 12 एप्रिल रोजी पासून सुरू केले आहे, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात झाडू व खराटा घेऊन महापुरुषांच्या पुतळ्याचा परिसर स्वच्छ केला , तसेच महापुरुषांच्या पुतळ्यांना पाण्याने स्वच्छ धुऊन परिसराची स्वच्छता केली .

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतनिमित्त गौरव सप्ताह महापुरुषांच्या पुतळ्याचे स्वच्छ्ता अभियाना अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भडकल गेट येथील पुतळा स्वच्छ करून सुरुवात केली व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी भाजपा छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, उत्सव समिती अध्यक्ष ॲड.अरविंद डोणगावकर, कार्याध्यक्ष .बबन नरवडे, राजेश मेहता, रवी एडके, शालिनी बुंदे, मंगलमूर्ती शास्त्री, सिद्धार्थ साळवे, अरुण गुदगे, सुभाष साबळे, सुनील देहाडे, प्रथमेश दुधगावकर, राहुल निकम, विशाल गंगावणे, सौ.लक्ष्मीताई गायकवाड यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

वृत्तांकन - अखलाख देशमुख 

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...