Wednesday, 12 April 2023

कल्याण येथील भरदिवसा घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास खडकपाडा पोलिसांनी केली शिताफीने अटक !

कल्याण येथील भरदिवसा घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास खडकपाडा पोलिसांनी केली शिताफीने अटक !

कल्याण, नारायण सुरोशी : कल्याणमध्ये भरदिवसा घरफोड्यांचे प्रमाण वाढलं आहे. त्यातच मोहने परिसरात एका चोरट्याने घरफोडी करत तब्बल 35 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. मात्र ज्या इमारतीमध्ये चोऱ्या झाल्या त्या ठिकाणी सीसीटिव्ही नसल्याने पोलिसांसमोर या चोरट्याचा शोध कसा घ्यावा हे मोठं आव्हान होतं. या पार्श्वभूमीवर डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक शरद झिने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या पथकाने या गुन्ह्यांचा शोध सुरू केला. खडकपाडा पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी परिसरातील सीसीटिव्ही तपासले. सीसीटिव्ही फुटेज व तांत्रिक फुटेजच्या आधारे अखेर या चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले .

रोशन जाधव याला अटक केल्यानंतर पोलिसांना त्याच्याकडून मोहने, आंबिवली, टिटवाळा ,शहापूर या भागातील आठ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलं. रोशनकडून पोलिसांनी ४७ तोळे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल ,महागडी घड्याळं असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

रोशन जाधव हा तीन वर्ष एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात काम करत होता. याच दरम्यान त्याला डान्सबारचा नाद लागला. त्यासाठी त्याला पैशांची कमतरता भासू लागल्याने त्याने चोरीचा मार्ग निवडला. भरदिवसा वॉचमन व सीसीटिव्ही नसलेल्या छोट्या इमारती तो शोधायचा व बंद घरे हेरून घराचं टाळं तोडून तो घरफोडी करायचा. गेल्या काही वर्षांपासून तो घरफोड्या करत होता. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...