डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित पूर्व तयारी बैठक - मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे काढण्याचे 'मा.प्रशासकां'चे आदेश !
१४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मा.प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटी कार्यालय येथे पूर्व तयारी बैठकिचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
शहरातील सर्व ०९ झोन अंतर्गत विवीध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या असे त्यांनी आदेशात केले. यात प्रामुख्याने मुख्य मिरवणूक मार्गावरील ज्या ठिकाणी रस्ता खूप खराब आहे त्या ठिकाणी पॅचवर्क व विद्युत रोषणाई करणे,त्या सोबतच इतर ठिकाणच्या मिरवणूक मार्गाचे देखील पॅचवर्क करण्यात यावे.
तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची रंग रंगोटी, किरकोळ डागडुजी ,या ठिकाणी स्वछता करणे .या बाबत सर्व सहायक आयुक्त यांनी विशेष दक्षता घ्यावी. सर्व वार्डातील बुद्ध विहार स्वछ करणे.
मिरवणूक मार्गावर मोबाईल टॉयलेट चे स्थान निश्चित करावे.
कचरा व्यवस्थापन करणे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे. मुख्य मिरवणूक मार्ग व इतर महत्वाच्या ठिकाणी विशेष करून क्रांती चौक व भडकल गेट येथे रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक औषधी उपलब्ध करणे.
क्रांती चौक व भडकल गेट येथे अग्निशमन वाहन तैनात करणे.
मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे काढणे. स्टेज साठी परवानगी देणे.नागरिकांना मिरवणूकी मध्ये ये जा करणेसाठी स्मार्ट सिटी बस ची व्यवस्था करणे.
मिरवणूक मार्गावरील लोंबकळ णाऱ्या वायर काढणे. मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्या कापणे बाबत संबंधित अधिकारी यांना आदेशीत करण्यात आले.
यावेळी मा अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, रविंद्र निकम, शहर अभियंता ए बी देशमुख, उपायुक्त-5 वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मुख्य अग्निशम अधिकारी, सर्व कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा, विद्युत, यांत्रिकी, रस्ते, ड्रेनेज व उद्यान), सर्व वॉर्ड अभियंता -झोन 1 ते 9, सर्व वॉर्ड अधिकारी- झोन 1 ते 9, उद्यान अधिकारी, सांस्कृतिक अधिकारी, जनसंपर्क यांची उपस्थिती होती.
वृत्तांकन - अखलाख देशमुख
No comments:
Post a Comment