रॅपर राजेश मुंगसेला कोर्टाकडून जामीन मंजूर झाला असून यापुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्या पाठीशी उभी राहणार असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिली.
राजेश मुंगसे याने पन्नास खोके वरती रॅप सॉंग तयार केलं, त्यामुळे त्याच्यावर सत्ताधारी पक्षातील लोकांनी गुन्हा दाखल केला होता. त्याने वैयक्तीक कोणावर टिका केली नाही. इंग्रज काळात ही अशी कारवाई केली नाही, त्याच्यापुढे जाऊन सत्ताधारी हे मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे टीकास्त्र दानवे यांनी केले.
राजेश मुंगसे याने त्याच्या रॅपमध्ये कोणाच नाव घेतल नाही किंवा अपशब्दाचा प्रयोग केला नाही. अशा प्रकारे गुन्हा दाखल करण योग्य नाही. एकप्रकारे सत्ताधारी लोकशाहीचा अपमान करत आहेत, अशी टीका दानवे यांनी केली.
ज्यांनी तक्रार केली त्यांच्या ट्विटरवर वरती ही पन्नास खोकेचा मॅसेज आहे. बैलांच्या अंगावर पन्नास खोके लिहिण्यात आले होते, नवरात्री मध्ये ही अनेक महिलानी ५० खोके म्हणाल्या, मग प्रत्येकावर कारवाई करणार का असा संतप्त सवाल दानवे यांनी उपस्थित केला. याविरोधात कायदेशीर लढा लढणार असल्याचे दानवे म्हणाले.
वृत्तांकन - अखलाख देशमुख
No comments:
Post a Comment