Sunday, 16 April 2023

मशीन मोबाईलवरून ऑपरेट करून शेतीला पाणी देणारा कल्याण मधील आधुनिक शेतकरी, मांजर्ली गावात फुलवला' सुर्यफुलांचा, मळा !

मशीन मोबाईलवरून ऑपरेट करून शेतीला पाणी देणारा कल्याण मधील आधुनिक शेतकरी, मांजर्ली गावात फुलवला' सुर्यफुलांचा, मळा !

कल्याण, (संजय कांबळे) : विज्ञानाचा कसा फायदा करून घ्यायचा हा ज्यांचा त्याचा प्रश्न आहे. विधायक की विघातक ?मात्र कल्याण तालुक्यातील मांजर्ली या छोट्याशा खेडेगावातील जगन सदानंद वारे या शेतकऱ्यांने 'ऑटो ऑपरेट इलेक्ट्रिक मोटर, ही ७:५ एचपी मशीन मोबाईलवर ऑपरेट करून शेतीला पाणी दिले असून, यामुळे माळरानावर सुर्यफुलांचा मळा फुलला आहे. यामध्ये या तरुण शेतकऱ्यांला कल्याण पचायंत समितीच्या कृषी विभागाचे सहकार्य लाभले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या कष्टाचे व जिद्दीचे कौतुक होत आहे.

कल्याण तालुक्यातील मांजर्ली हे गाव टिटवाळा बदलापूर या रस्त्यावर वसले आहे. या गावातील लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. पारंपरिक पद्धतीने शेती केल्याने तसे भातच हे मुख्य पिक घेतले जाते. या गावातील सदानंद वारे हे देखील अशाच पद्धतीने शेती करत होते.

परंतु त्यांचा मुलगा जगन सदानंद वारे याने १२ वी डीएड पर्यंत शिक्षण पूर्ण केले व आपल्या ४/५ एकर शेतीवर लक्ष केंद्रित केले. तसे पाहिले तर मांजर्ली हे गाव उल्हास व बारवी नदीपासून खूपच लांब असल्याने पाणी पुरवठा कसा करावा या विचारात असतानाच त्याने कल्याण पंचायत समितीच्या कृषी अधिका-याची भेट घेऊन परिस्थिती कथन ,यानंतर कृषी अधिकारी सुनील संत, दिनेश घोलप आणि अनिस तडवी यांनी कृषी विकास अधिकारी जिप ठाणे श्रीम, सारीका शेलार आणि कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद योजना २०२२/२३ शेतकऱ्यांना सिंचन साहित्य पुरवठा करणे. अंतर्गत पाईपलाईन करीता  ४ लाख ८० हजार रुपये अनुदान दिले. शेतकरी जगन वारे यांनी लगेचच उल्हास नदीतून सुमारे २ हजार मीटर इतकी लाईन टाकली. हे करताना इतर शेतकऱ्यांना त्रास नको, वाद नको म्हणून प्रत्येकाच्या शेतात टी ठेवले, शिवाय आंब्याच्या झाडाकरीता २ ठिकाणी नळ कनेक्शन दिले. गाव आणि नदीचे अंतर खूपच असल्याने जगन वारे यानी ऑटो ऑपरेट इलेक्ट्रिक मोटार ७:५ एचपी ची पाण्यात बसवून त्यामध्ये "सिम"चा नंबर स्वतः च्या मोबाईल मध्ये सेव्ह करुन गँस बुकिंग प्रमाणे मोटार चालू ७ तर बंद ९ नंबरवर केली. यामुळे तो महाराष्ट्रात कुठेही असला तरी मोबाईलवर शेतीला पाणी दिले जाऊ लागले. लाईट गेली, मोटार ओव्होरलोड झाली तीही माहिती मोबाईलवर मिळू लागली.

यामुळे इतरही शेतकऱ्यांना याचा फायदा झाला.आजमितीस, सदू वारे, बाळाराम वारे, वसंत वारे, चिंतामण वारेआप्पा वारे, मंगल घारे, पंडित घारे आणि हरि शिसवे अश्या ८/१० शेतकऱ्यांची ५/७ एकर शेती सिंचनाखाली आली आहे. 

जगन वारे याचे वडील सदानंद वारे, आई, पत्नी अशी लोक शेतीत राबत आहेत. काकडी, लवगी मिरची, सिमला, पडवळ, अशी भाजीपाला पिके घेतली आहेत. मागील वर्षी खर्च वजा जाता सुमारे ४/५ लाख रुपये निव्वळ नफा त्याला मिळाला आहे. सतत नवनवीन प्रयोग करण्यात जगन नेहमीच पुढे असतो. आता त्यांनी कल्याण पंचायत समितीच्या कृषी अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली ८/१० गुंठे जमिनीवर सुर्यफुलांची लागवड केली. सुर्यफुलांची झाडे देखील अगदी जोमाने वाढली आहे. हा असा प्रयोग कल्याण तालुक्यातील पहिल्यांदा असल्याचे समजते. या शिवाय काकडी, मिरची,याचे पिक देखील चांगले आले आहे. त्यामुळे यावेळी चांगला फायदा होईल असे शेतकरी जगन वारे यांनी सांगितले. माळरानावर फुललेला हिरवागार मळा बघून मन भरून जाते,
सध्या तरुण पिढी मोबाइलच्या/गेमच्या इतकी आहारी गेली आहे की, वेळ पैसा आणि प्रंसगी जीवही जातो आहे. मोबाईल ही आवश्यक गरज बनली असलीतरी ती जिवावर बेतेल इतकी नको, यामुळे, भांडण, हाणामारी, बदनामी, प्रंसगी जातीय दंगली घडल्याची उदाहरणे आहेत. केवळ कल्याण तालुक्याचा विचार केला तर, येथे जमिनी विकून गाड्या, बंगले बांधणारे कमी नाहीत. आज शहरानजीकची गावे ७/१२ वरुन कधीच गायब झाली आहेत. अशा वेळी जगण सारख्या तरुण शेतकरी डिएड करुनही नोकरीच्या मागे न धावता आपली पिढ्यानपिढ्या ची "काळीमाय, टिकवून त्यातून घामाचे मोती पिकवतो आहे. याचा तालुक्यातील इतर तरुणांनी आदर्श  घ्यायला नको का,?

जगण वारे यांच्या या प्रयत्नांमुळे परिसरातील २०/२५ एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून जिल्हा परिषदेच्या अति मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपूते, मुख्य कार्यकारी अधिकारी मनूज जिदंल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हातील सिंचन क्षेत्रात वाढ करण्यात येणार आहे, त्यामुळे याचा इतरही शेतक-यांनी लाभ घ्यावा,

No comments:

Post a Comment

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत स्वच्छतेचा बोजवारा..

कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणा मुळे स्वच्छतेचा बोजवारा.. घनकचरा विभागाचे उपायुक्त कोकरे कोकलत आहेत कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत.. ...