संभाजीनगरमधील सामुहिक बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा !
*पीडित महिलेच्या कुटुंबाची विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी घेतली भेट*
चिकलठाणा, अखलाख देशमुख, दि ७ : - चिकलठाणा भागात एका महिलेवर सामुहिक बलात्काराची घटना घडली होती. या गंभीर घटनेची दखल घेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी पीडित महिलेच्या घरी भेट दिली. तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी दानवे यांनी केली आहे.
या घटनेतील मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबियांवर ओढावलेल्या दु:खात दानवे यांनी सहभागी होऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. “सामुहिक बलात्काराची ही घटना चिंताजनक आणि मन हेलावणारी आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीवर राज्याच्या पोलीस आणि गृह विभागाचा वचक राहिलेला नाही असे या घटनेवरून दिसून येते, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी व्यक्त केली.
सदरील घटना निर्भया प्रकरणासारखेच गंभीर असून राज्यातील महिला असुरक्षित आहेत याची जाणीव राज्याच्या गृहमंत्र्यांना राहिलेली नाही. पीडित महिलेला तातडीने न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब डांगे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, उपशहरप्रमुख रमेश दहिंदडे, विष्णू गुंठाळ, सचिन वाघ, सोमनाथ नवपुते, संतोष जाटवे, रामेश्र्वर कोरडे, किशोर हनुमते ,शिवप्पा बंदरे सुनील सदगिर, गोपीनाथ पठाडे, मनोज बोरा, संजय कोरडे ,सारंगधर सोत्रे, भागिनाथ दहीहंडे, कृष्णा रिठे, सोमनाथ बोचरे, प्रवीण खरे, सुरेश प्रशाद, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, उपजिल्हा संघटक दुर्गा भाठी, मनिषा खरे आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment