अल्पसंख्याक समाजाने कॉंग्रेस पक्षाच्या च्या पाठीशी उभे रहावे - *शेख युसूफ शहराध्यक्ष*
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २४ : आज दिनांक २४ एप्रिल २०२३ रोजी औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे दुपारी ३ वाजता पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे नवनिर्वाचित नियुक्त झालेले पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला होता. हा सत्कार सोहळा औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आला. सत्कार सोहळा प्रसंगी संबोधीत करतांना शेख युसूफ यांनी अल्पसंख्याक समाजाला आवाहन केले की, येणा-या काळात महाराष्ट्रात आणि देशात कॉंग्रेस पक्षाची सत्त्ता येणार आहे. आज जो भाजपाने अल्पसंख्याक समाजावर अन्याय केला आहे तो अन्याय दुर करण्याचे काम येणा-या काळात कॉंग्रेस पक्ष करेल. अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी कटीबध्द राहील असे भाषण केले. यावेळी मंचावर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी चे सरचिटणीस जफर अहेमद खान यांनी भाषण केले यांनी आपल्या भाषणामध्ये शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष हे फादर असतात म्हणुन त्यांना फादर कॉगे्रस म्हणले जाते. सर्व फ्रंटलचे पदाधिका-यांनी शहर कॉंग्रेस कमिटीचे हात मजबुत करावे असे भाषणात सांगीतले.
यावेळी नियुक्त झालेले पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष इब्राहीम पठाण, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष गुलाब पटेल, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष युसुफ अन्सारी, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीस हरचणसिंग गुलाटी, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे सरचिटणीस कैसर आजाद, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे सचिव इंजि. इप्तेखार शेख, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे सचिव हेमंत बारसे यांचा सत्कार सोहळा शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंचावर शेख युसूफ लिडर यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सचिव खालेद पठाण, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा दिपाली मिसाळ, माजी शहर अध्यक्ष अॅड.सय्यद अक्रम, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष शेख अथर, इंटकचे जिल्हाध्यक्ष डॉ.निलेश अंबेवाडीकर, अनुसुचित जाती विभागाचे शहर अध्यक्ष डॉ.अरुण शिरसाठ, ओबीसी विभागाचे शहर अध्यक्ष अनिल माळोदे, अपंग सेलचे शहर अध्यक्ष मुददसिर अन्सारी, विज्ञान तंत्रज्ञान चे शहर अध्यक्ष शेख रईस, डॉ.पवन डोंगरे, अनिस पटेल, इरफान इब्राहीम पठाण, डॉ.सरताज पठाण, आकेफ रजवी, सहकार सेलचे शहर अध्यक्ष माधवी चंद्रकी, उमाकांत खोतकर, मुजफर खान, लियाकत पठाण, साहेबराव बनकर, शिवा गवळे,शेख सलीम, सययद फयाजोददीन, आनंद भामरे, दिपक नवगीरे, संतोष भिंगारे, सुभाष देवकर, विजय रुपेकर, प्रविण केदार, शिरीष चव्हाण, जुबेर पटेल, इम्रान पटेल, जावेद पटेल, सलमान खान, मोहसीन इंजिनियर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सुत्रसंचालन निलेश अंबेवाडीकर यांनी केले. व आभार प्रदर्शन अनिस पटेल यांनी केले.
No comments:
Post a Comment