न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्तीभावाने साजरी !
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
महाराष्ट्राला तिर्थक्षेत्रांची विशेष परंपरा लाभलेली आहे. या परंपरेनुसार विविध ठिकाणी जागृत देवस्थाने आहेत त्यापैकी जे. एन. पी. टी बंदर घारापुरी (एलिफंटा लेणी) यांच्यामधील न्हावा गावामधील मंदिर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे.
या गावातील गावदेवीची यात्रा पालखी सोहळा चैत्र शुद्ध कृष्ण पक्ष रविवार दि. ९ एप्रिल २०२३ रोजी मोठ्या उत्साहात गावकऱ्यांनी संपन्न केला. अनेक गावामधील ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेतले व हजारो भाविकांनी यात्रेचा आनंद लुटला, ग्रामस्थांनी जत्रेची विशेष तयारी केली होती.
ग्राम सुधारक मंडळाचे अध्यक्ष श्री. गजानन म्हात्रे व उपाध्यक्ष श्री. जयेंद्र पाटील, श्री निलेश भोईर, श्री मोरेश्वर पाटील आणि खजिनदार श्री गणेश भोईर, सहखजिनादर श्री अनंत म्हात्रे, श्री. सदानंद पाटील, श्री. सुरेश म्हात्रे आणि सदस्य, तसेच इत्यादी पदाधिकऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.
तसेच पालखी सोहळ्यांसाठी मुंबई, ठाणे व पनवेल तसेच उरण तालुक्यातील आगरी-कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहीले होते. गावदेवीचे देऊळ गावकऱ्यांच्या सहभागाने बांधण्यात आले आहे. ही देवी नवसाला पावते म्हणून महाराष्ट्र व परराज्यातूनही अनेक भाविक येथे दर्शनाला येतात. गावदेवीची प्रसन्न व लोभसवाने रुप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळे भरून पाहावे. सर्व भक्तांनी आरोग्य, सुखशांती प्रदान करण्याची विनंती देवीला केली असे सदर गावचे सुपुत्र अशोक दामू भोईर यांनी बोलताना सांगितले.
No comments:
Post a Comment