Monday, 10 April 2023

सोयगावच्या रँचोला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित ; सोयगावचे नाव दिल्ली दरबारी !

सोयगावच्या रँचोला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित ; सोयगावचे नाव दिल्ली दरबारी !

सोयगावचा रँचो इंद्रजित खस यांना राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करतांना

सोयगाव, दिलीप शिंदे, ता.१०...सोयगावचा रँचो इंद्रजित खस यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी सोमवारी सायंकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवन कलचरल सेंटर येथे एन आय एग चे ११ व्या द्विवार्षिक राष्ट्रीय ग्रास रूट इनोव्हेशन आणि इनोव्हेशन उत्कृष्ट पारंपरिक ज्ञान पुरस्कार प्रदान केला यावेळी राष्ट्रपती भवन जवळील स्पोर्ट्स ग्राऊंडवर त्यांनी फेस्टिव्हल ऑफ इनोव्हेशन अँड इंटरप्रेन्यारोशिप २०२३ चे उदघाटन केले यामध्ये इंद्रजित खस यांचे नवीन तयार करण्यात आलेल्या मॉडेल चे प्रदर्शनात मांडण्यात आले आहे..या पुरस्काराचे मानकरी ठरलेले इंद्रजित खस यांनी सोयगावचे नाव दिल्ली दरबारी कोरले आहे  पुरस्कार देतांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी इंद्रजित खस यांच्या कार्याला संबोधित करतांना सांगितले की महाराष्ट्रात तळागाळातील नागरिकांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची आणि त्यांच्या क्षमतेनुसार देशाची सेवा करण्याची क्षमता आहे नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन अशा नवं कल्पनांना प्रोत्साहन आणि समर्थन देण्यात महत्वाची भूमिका बजवते असे त्यांनी सांगितले  असल्याची माहिती इंद्रजित खस यांनी दिली आहे.
सोयगावचा रँचो इंद्रजित बरबील सिंग खस यांनी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून शेतकऱ्यांच्या विविध शेती उपयुक्त औजारे बनवून शेतकऱ्यांचा मार्ग सुकर करत असताना त्यांनी नव्याने तयार केलेल्या लागवड केलेल्या सुबाभूळ वृक्षांची कटिंग व त्यांची खोडे व मुळ काढण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या मशिनला त्यांना सोमवारी दिल्लीत राष्ट्रपती भवनात त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याबद्दल त्यांचे तालुक्यात अभिनंदन होत आहे....

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...