Wednesday, 12 April 2023

मुंबई वडोदरा एक्सप्रेस बाधित शेतकऱ्यांसाठी काँग्रेस मैदानात, मातीच्या भरावामुळे शेती पाण्यात !

मुंबई वडोदरा एक्सप्रेस बाधित शेतकऱ्यांसाठी काँग्रेस मैदानात, मातीच्या भरावामुळे शेती पाण्यात !

कल्याण, (संजय कांबळे) : अगोदर विविध प्रकल्पांच्या भू संपादनामुळे कल्याण तालुक्यातील शेतकरी त्रासला गेला आहे, थोडिफार शिल्लक राहिलेल्या शेतीत कसेतरी धान्य पिकवून कुंटूबाचा उदरनिर्वाह केला जात आहे, असे असताना आता पुन्हा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीनी पाण्यात जाणार आहे. मात्र या विरोधात आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे कल्याण तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे यांनी दंड थोपटले असून बाबत कल्याण तहसीलदार जयराज देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.

कल्याण तालुक्यातून मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग व मुबई वडोदरा एक्सप्रेस हे दोन मोठे महामार्ग जात आहेत, शिवाय कल्याण मुरबाड रेल्वे मार्ग देखील प्रस्तावीत आहे. या सगळ्यात तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जमीनी बाधित झाल्या आहेत. मुंबई वडोदरा एक्सप्रेस मध्ये, संतेचा पाडा, मानिवली, रायते, पिंपळोली दहागाव, आपटी, एरजांड, आदी विविध गावातून मुंबई वडोदरा एक्सप्रेस हा महामार्ग जातो, यासाठी मोठ्या प्रमाणावर मातीचा भराव केला जात आहे  काही ठिकाणी तर किमान १०/१५ फुटांपर्यत माती टाकण्यात आली आहे, तर काही मोजक्या ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा निचरा होण्यासाठी मो-या ठेवण्यात आल्या आहेत, परंतु कल्याण तालुक्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने भात पिके, भाजीपाला पिके, फळबागा कुजू शकतात, तसेच जमीन नापीक बनू शकते.

यामुळे शेतकऱ्यांना मोठा झटका बसू शकतो. म्हणूनच मागील अनुभव पाहता यावेळी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी शासनाने या बाबतीत लक्ष घालून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पावसाळ्यात होणारे संभाव्य नुकसान टाळावे. असे सांगून तसे झाले नाही तर या विरोधात तीव्र अंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुका अध्यक्ष सोमनाथ पुरुषोत्तम मिरकुटे यांनी दिला आहे. तसे निवेदन कल्याण तहसीलदार जयराज देशमुख यांना दिले आहे.

याबाबत पिंपळोली येथील शेतकरी कृष्णा मिरकुटे म्हणाले, या महामार्गामुळे माझी संपूर्ण शेती पाण्यात बुडणार आहे, त्यामुळे आम्ही जगायचे कसे? याचा विचार करावा तर या मार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या लवकरच बैठका घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल. असे मिरकुटे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...