"जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी" यांना खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी महाराष्ट्र भूषण -२०२२ पुरस्काराने करणार सन्मानित !
*केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रहाणार उपस्थित*
नवी मुंबई, प्रतिनिधी : खारघर शहरात येत्या रविवारी १६ तारखेला महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाचा सोहळा पार पडणार आहे. हा पुरस्कार "बैठक संप्रदायाचे ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी" यांना प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असुन लाखोंच्या संख्येने श्री सदस्य खारघर शहरात दाखल होणार आहेत.
मागील महिन्यात हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च मानला जाणारा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार "आप्पासाहेब धर्माधिकारी" यांना देण्यात येणार आहे, याविषयी स्वत: 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे' आणि 'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस' यांनी "आप्पासाहेब धर्माधिकारी" यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना याविषयीची माहिती दिली.
धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार १६ एप्रिल (रविवारी) रोजी खारघरमध्ये हा पुरस्कार सोहळा होणार आहे. "केंद्रीय गृहमंत्री अमित शाह" यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार असून, शहांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचं समजते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा यापूर्वी घेतला आहे. दरम्यान, या कार्यक्रमाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च मानला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणार आहे. या सोहळ्याला साधारण २० लाखांपेक्षा श्रीसदस्य उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सोहळ्याचे नियोजन नीट असावे, सुरक्षा कटेकोट असावी, पोलिस बंदोबस्त तैनात असावा, आदीच्या तयारीची बैठक घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळं या कार्यक्रमाला राज्यभरातून धर्माधिकारी यांचे अनुयायी येणार आहेत.
No comments:
Post a Comment