Thursday, 13 April 2023

पैठण व आपेगांव येथील विकास कामे जलदगतीने पूर्ण करा - *पालकमंत्री संदिपान भूमरे*

पैठण व आपेगांव येथील विकास कामे जलदगतीने पूर्ण करा - *पालकमंत्री संदिपान भूमरे*

छत्रपती संभाजीनगर, दि १३ : 

      श्री क्षेत्र पैठण व आपेगांव येथे अनेक भाविक भेट देतात. त्यामुळे पैठण व आपेगाव येथील विकास प्राधीकरणांतर्गत सुरू असलेली विकास कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी दिले.

      पालकमंत्री संदिपान भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली पैठण व आपेगाव विकास प्राधिकरणांतर्गत मंजुर आराखड्यातील विकास कामांची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, आमदार प्रदीप जैस्वाल, उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे तसेच संबंधित विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत पालकमंत्र्यांना सादरीकरणाव्दारे विकास कामांची माहिती देण्यात आली.

      पालकमंत्री म्हणाले पैठण येथील नाथ मंदिरातील विद्युत रोषणाईचे सुरू असलेले काम तातडीने पूर्ण करावे तसेच मंदिरा शेजारी असणारे अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. आपेगांव येथील घाटाचे काम लवकर पूर्ण करावे. या प्राधिकरणासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

No comments:

Post a Comment

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !!

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !! उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस...