ऐतिहासिक कल्याण शहराच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन !
कल्याण,, दि.१३ : कल्याण येथील कल्याण तालुका बुद्धीबळ संस्था, कल्याण व कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संयुक्त विद्यमाने फिडे मानांकन राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धा ही १६ एप्रिल रोजी नवरंग बॅक्वइट एसी हॉल (सभागृह), फोर्टिस हॉस्पिटल जवळ, बैलबजार, कल्याण (पश्चिम) येथे घेण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार विश्वनाथ भोईर तथा मा. नगरसेवक संजय पाटील यांनी आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ही पत्रकार परिषद आज दुपारी एक वाजता आमदारांनी आयोजित केली होती, पुढे माहिती देतांना म्हणाले की, कल्याण येथे प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते आहे, यात सातशे ते आठशे स्पर्धक भाग घेतील असे सांगितले, ही होणारी राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा २०२३, ही स्पर्धा कल्याण तसेच आजुबाजूच्या परिसरातील खेळाडूंना वाव मिळावा, प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर सहज जाता यावे या उद्देशातून ठेवण्यात आलेली आहे. सदर स्पर्धेसाठी वयाची कोणतीही अट असणार नाही.. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना प्रमाणपत्र व विजेत्या खेळाडूंना रोख बक्षीस, ट्रॉफी व प्रमाणपत्र दिली जाणार आहे. सदर स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक होंडा ॲक्टिव्हा व इतर बक्षीसं रोख रक्कम दोन लाख रुपयांची ठेवण्यात आलेली आहेत तसेच ९७ 🏆 ट्रॉफीज पण देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इच्छुक खेळाडूंसाठी प्रवेश फी १०००/- रुपये आकारण्यात आली आहे, पण आमदार विश्वनाथ भोईर यांनी ज्या गुणवंत खेळाडू ज्यांची आर्थिक परिस्थिती नसेल व त्यांना ह्या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांची फी भरण्याचे आश्वासन दिले आहे.
स्पर्धेचा लाभ जास्तीत जास्त खेळाडूंनी घ्यावा असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
ही स्पर्धा दि. १६/०४/२०२३ रोजी कल्याण पश्चिम, बैलबजार येथील फोर्टिस हॉस्पिटल जवळील नवरंग बॅक्वेट एसी हॉल मध्ये आयोजित केली आहे. यात भाग घेण्यासाठी १५ एप्रिल संध्याकाळ पर्यंत कालावधी असून आपण मार्गदर्शन साठी खालील नंबर वर संपर्क साधावा....
मोहित लाढे - +919029106570
सहर्ष सोमण - +919321726972
No comments:
Post a Comment