शेतकरी शेतमजूर कामगार युवक विद्यार्थी महिला कष्टकरी समुदायालाभारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आवाहन* भाजप हटाव ! देश बचाओ !! भारतीय कम्युनिस्ट पक्षाची देशव्यापी जनजागरण मोहीम !! कशासाठी?
जळगाव, प्रतिनिधी.. १४ एप्रिल २०२३ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून १५ मे २०२३ रोजी काळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देशातील व महाराष्ट्र राज्यातील सामाजिक राजकीय आर्थिक प्रश्नाचे जनतेला माहिती व्हावी म्हणून देशव्यापी जनजागरण मोहीम सुरु केली आहे. कारण गेल्या ९ वर्षाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय जनता पक्षाच्या सत्ता काळात भारताचे संविधान राज्यघटनेतील मूल्यांची सातत्याने अवहेलना सुरू आहे. जणू भारतीय नागरिकांचे जीवन अस्थिर करण्याचां विडा भाजपा राजवटीने उचललेला आहे.. हे खालील मुद्द्यांवरून लक्षात येते 1) एनआरसी, सी ए ए सारखे नागरिकत्व चे तथाकथित पुरावे मागणारे कायदे करून अल्पसंख्यांक समुदायावर दहशतवाद लादला जात आहे
2) कधी माब लिंचींग ,कधी भोगा वरून तर कधी लवजीहाद, हिजाब विरुद्ध दुशप्रचार करून संविधानातील विविधतेत एकता या संकल्पनेला उध्वस्त करीत आहेत. अशाच असहिष्णू व्यवहारातून देशात पुरोगामी विचारवंतांचे खून झाले. त्यात कॉम्रेड शहीद गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, डॉक्टर कलबुर्गी यांचे खून झाले .सत्तेच्या विरुद्ध विचार मांडणाऱ्या पत्रकारांना जेलमध्ये डांबले जात आहे. दुसरीकडे भाजपा संघ परिवाराच्या सत्ता काळात अत्याचार, बलात्कार, खून, बॉम्बस्फोट करणाऱ्या गुन्हेगारांना मोकळे सोडून त्यांचे सत्कार सोहळे केले जात आहेत. भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष समता मूल्यांना संपुष्टात आणत आहेत.
3) त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील व्यक्तींची राज्यपाल म्हणून खास नेमणुका केल्या जात आहेत. त्यांनी तर १२ राज्यातील पक्ष फोडून अनेक ठिकाणी अनैतिक मार्गाने सत्ता स्थापन केल्या. त्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांच्या समावेश आहे .फोडाफोडी साठी ईडी, सीबीआय, तपासयंत्रणा चा दुरुपयोग केला जात आहे. भाजपात गेलेवर मात्र ईडी, सीबीआय या तपास यंत्रणेपासून मुक्ती मिळते. महाराष्ट्रात तर मागील राज्यपालानी सतत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांची बदनामी केलेल्या घटना वेळोवेळी घडल्या आहेत, महाराष्ट्रात अनैतिक पद्धतीने भाजपला सत्ता मिळवून देण्यात त्याचा महत्वाचा वाटा राहिला आहे, त्यातून घटनात्मक लोकशाही धोक्यात आणली आहे.
4) विदेशातील काळा पैसा परत आणण्याच्या भाजपा सरकारने वल्गना केल्या पण नोटाबंदी करून श्रमिक जनतेचीच कोंडी केली. मोठ्या प्रमाणात बड्या धेडांना काळा पैसा लपवण्यास मदत केली
5) कोविड लाकडाऊन काळात सामान्य जनतेला ऑक्सिजन व औषधे यांच्या अभावमुळे मृत्यूला सामोरे जावे लागले. उत्तर प्रदेशात तर अर्धवट मिळालेली प्रयत्न गंगेत वाहत होती त्या काळात व नंतरच्या काळात स्थलांतरित मजुरांच्या हालांना पारावर राहिला नव्हता. दुसरीकडे जनतेला दिलासा देण्याऐवजी कार्पोरेट घराण्यांना सवलती दिल्या. त्यांची लाखो कोटी रुपयांची कर्ज माफ केली
6) हे कमी की काय ? कर्जबुडव्या धनदांडग्यांना विदेशात जायला मदत केली. त्यात ललित मोदी, निरव मोदी, विजय माल्या यांचा समावेश आहे. सर्वसामान्य जनतेला मात्र खतापासून मिठापर्यंत ते मिठापासून वहीच्या रद्दीपर्यंत ते सर्व वस्तूनवर जीएसटी लावून लोकांच्या खिशावर दरोडे टाकणे सुरू केले आहे. यातून महागाई वाढत आहे, गॅस, डिझेल, पेट्रोल, जीवनावश्यक औषधे, खते, बी बियाणे, बांधकाम साहित्य, सिमेंट, रेती, लोखंड, शिक्षण फी, रेल्वे, एसटी दरवाढ यांचा समावेश आहे.
7) गेल्या ७० वर्षात जनतेच्या करातून उभारण्यात आलेले सार्वजनिक उद्योग, सरकारी शासन निर्मिती कारखाने, विमानतळे, बंदरे, सार्वजनिक वाहतूक, वीज निर्मिती केंद्र कवडीमोल भावाने कार्पोरेट कंपन्यांना विकून टाकण्याचे धोरण वेगाने अवलंबले जात आहे. कारण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक बँक यांनी घातलेल्या अटीवर हे सरकार काम करीत आहे. कारण अब्जावधी कोटी रुपयांचे कर्ज या सरकारने उचललेले आहे. भारतावर कर्जाचा डोंगर उभा केला आहे, त्यामुळे रोजगार निर्मिती हा भाजप सरकारचा कार्यक्रम राहिलेला नाही. उद्योग, कारखाने, सेवा उद्योग त्याचबरोबर मिलिटरी मध्ये सुद्धा कंत्राटीकरण लादून अग्नीविर योजना राबवून युवकांच्या भविष्याशी टिंगल केली जात आहे
8) आरोग्य यावरील सरकारी अनुदानात कपात केल्यामुळे महागले आहे सरकारी दवाखान्यांचा इमारती उभ्या केल्या जात आहेत.. पण औषधी साहित्य सुविधा कुठे ? जनतेच्या विश्वासाला सरकारी आरोग्य सेवा उतरलेली नाही, पण दुसरीकडे वैद्यकीय उपचारात च्या खर्चाला कोणते लगाम राहिलेला नाही जनतेचे आरोग्य स्वस्त झाले आहे.
9) या सर्व खाजगीकरणातून सामाजिक न्याय व आरक्षण देखील संपूर्णपणे संपुष्टात आणले जात आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हिंडेनबर्ग अहवाल अडाणी यांच्या कंपनीचे घसरलेल्या शेअर बाजारात एल आय सी/ एस बी आय चे ८४ हजार कोटी धोक्यात आणले. प्रॉव्हिडंट फंडाच्या रकमा शेअर बाजाराच्या कशेत आणून ठेवले. आहेत
10) पैशाच्या जोरावर देशातील बंदरे, खाणी, वीज निर्मिती प्रकल्प घेऊन खाजगीकरणाच्या सपाटा सुरू आहे.
11) शेती अर्थव्यवस्थेवर सरकारने हल्ला करून एम एस पी दिलेली नाही, त्यामुळे शेतीमालाचे भाव सतत उतरत आहेत त्यात कपाशी, काजू, ज्वारी, बाजरी, मका आदीं पासून काजी, नारळ, हळद आदी उत्पन्नाचा समावेश आहे, शेतकऱ्यांचे कंबर मोडले जात आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना त्यांची शेतीमालाची हमीभावासाठी आंदोलन केली तर त्यांनाच खलिस्तानवादी देशद्रोही म्हणून हिनवण्यात येत आहे. रोजगार हमी योजना ५०००० कोटी रु आणि अन्नसुरक्षा योजनात एक लाख कोटी रुपयांची तरतूद कमी करून सर्वसामान्य शहरी जनतेच्या व ग्रामीण जनतेचा रोजगार अन्नसुरक्षा हिरावून घेतला जात आहे
12) औद्योगिक कामगारांवर कुऱ्हाड.. देशातील कामगारांना न्याय देण्यासाठी बनवण्यात आलेले कायदे मोडीत काढून किमान वेतन, फंड, बोनस हे लढून मिळवलेले अधिकार संपुष्टात आणले जात आहे तथाकथित ४ कामगार संहिता लादल्या जात आहेत .कायम नोकरी हा प्रकार सरकारी शब्दकोषातून रद्द झाला आहे. युवकांना शाश्वत रोजगार मिळणे दुरापास्त झाला आहे महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे उद्योग राजकीय स्वार्थासाठी गुजरात व अन्य राज्यात पळवणे सुरू झाले आहे. बेछूट कंत्राटीकरण सुरू आहे. देशातील विविध योजना कर्मचारी त्यात अंगणवाडी आशा शालेय पोषण आहार कर्मचारी, गटप्रवर्तक, कंत्राटी नर्सेस, रोजगार सेवक, उमेद संगणक कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांचे शोषण केले जात आहे. ग्रामपंचायत कर्मचारी सहकार क्षेत्रातील कर्मचारी पर्जन्य मापक यांना किमान वेतन मिळत नाही. सामाजिक सुरक्षा नाकारले जात आहे. त्यांच्या जीवनाला हलाखीचे जीणे प्राप्त झाले आहे. समृद्धी मार्गाच्या बाता करतात पण गावोगावी तालुक्यांना जोडणारे रस्ते खराब झालेले आहेत. पण वंदे मातरम रेल्वे सुरू करण्यात येत आहे. पण पॅसेंजर एक्सप्रेस मेल या रेल्वेला सामान्य जनतेसाठी पुरेशा बोगी नाहीत.
बंधुनो, ज्या महाराष्ट्राने स्वातंत्र्यलढ्यात मोठी भागीदारी केली स्वतःचे आयुष्य पणाला लावून इंग्रजांच्या गुलामगिरी लढा दिला. तिथं कार्पोरेट घराण्याचा मदतीसाठी हितसंबंधासाठी भाजप आरएसएस सरकार लोकशाहीची गळचेपी करून देशावर धर्मांध हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न करीत आहे त्यासाठी चंद बहुसंख्येच्या हिंदू तसेच अल्पसंख्यांक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, आदिवासी धर्मातील जातीतील कष्टकरी जनतेची आरोग्य, शिक्षण, रोजगार अधिकार संपवत आहे, तेव्हा बंधू भगिनींनो, आपण स्वस्थ बसून चालायचे नाही. हुकूमशाही विरुद्ध लढा करावाच लागेल पुरोगामी परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात छत्रपती शिवराय, संत नामदेव, संत तुकाराम, हुतात्मा राजगुरू यांच्या यांच्या भूमीवर यांचे भूमीवर अशा लोकांच्या नंगानाच किती दिवस चालू ठेवणार? महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सांगणाऱ्या भूमीवर महाराष्ट्रात लालबावटा हाती घेऊन १०५ हुतात्मांनी बलिदान केले. त्याच महाराष्ट्राला लुटले जात आहे. आपण गप्प किती दिवस बसायचे? जिथे क्रांतीसिंग नाना पाटलांनी शेतकरी आंदोलन पटवले तेथेच शेतकऱ्यांना लुबाडला जात आहे. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी कामगारांना जागवली. परंतु तेथेच किमान वेतन बोनस नोकरीची शाश्वती घालवली जात आहे. . म्हणून कामगार शेतकरी शेतमजूर आदिवासी विद्यार्थी युवक महिला बंधू भगिनींनो जागे व्हा !! भाजपा हटाव महाराष्ट्र बचाओ भाजपा हटाव देश बचाओ !! प्रतिगामी धर्मांध हुकूमशाही विचारसरणीचे शेतकरी कर्मचारी कामगार आदिवासी महिला विरोध सरकार हाणून पाळा !! संविधान बचाव देश बचाओ ! महाराष्ट्र बचाव !! ही नम्र आवाहन
.................आपले विश्वासू......
कॉम्रेड अमृत महाजन, लक्ष्मण शिंदे, कॉ. राजेंद्र झा, ज्ञानेश्वर पाटील, प्रभारी सचिव भाकप जेडी ठाकरे, कालू कोळी, देविदास बोंदरडे, निर्मला शिंदे, गोरख वानखेडे, वासुदेव कोळी वाल्मीक मैराले, चंद्रकांत माळी व भाकप, आयटक, लाल बावटा, शेतमजूर युनियन, किसान सभा, आदिवासी महासभा पदाधिकारी व कार्यकर्ते....
No comments:
Post a Comment