बोरगावच्या शेतकऱ्यांने उद्धव ठाकरेंकडे मांडली कैफियत - *विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतला पुढाकार*
बीड, अखलाख देशमुख, दि १३ : विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे आज बीड जिल्ह्याच्या गारपीटीमुळे नुकसानग्रस्त पाहणी दौऱ्यावर असताना त्यांनी दत्तू भागवत शिंदे या शेतकऱ्याच्या शेतातील बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी दानवे यांनी पुढाकार घेऊन नुकसानग्रस्त शेतकरी शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिले असता, त्या शेतकऱ्याने आपली कैफियत पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली.
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दत्तू भागवत शिंदे यांची भ्रमणध्वनी वरून गारपिटीने नुकसानाची चौकशी केली व या संकटाला सामोरे जाण्यासाठी धीर दिला. तसेच दानवे यांनी सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली. शिंदे यांची दोन एकर टरबूज,
दीड एकर मिरची व एक एकर काकडी १० गुंठे कांदा, अर्धा एकर टोमॅटो अशी २५ लाख रुपयांच्या पिकांची गारपटीने नुकसान झालेले आहे.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दत्तू भागवत शिंदे यांच्या पाल्याची एमबीएची फीस कमी करण्याची तसेच त्यांना घरकुल मिळवून देण्याचा शब्द दिला. बीड जिल्ह्यात गेल्या शनिवारी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड जिल्ह्यात अधिक नुकसान झाले आहे.
आज विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करून शेतकऱ्यांचे संवाद साधला व त्यांना मदत मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी जिल्हाप्रमुख बीड अनिल दादा जगताप, जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी सागर बहिर किसान सेना जिल्हा संघटक परमेश्वर सातपुते, शिवसेना जिल्हा संघटक नितीन धांडे, बाबासाहेब घुगे, शेख निजाम, शामराव पडुळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशिष मस्के, सुशील पिंगळे, गणेश वरेकर, हनुमान पिंगळे, शिवसेना तालुकाप्रमुख बीड गोरख सिंघण, माजी जि.प.सदस्य किशोर जगताप, शिवसेना शहर प्रमुख सुनील सुरवसे, सुदर्शन धांडे, संदिपान बडगे, गणेश मस्के, जगदीश उबाळे, रमेश नवले, अनिल माने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment